Viral : लॉकडाऊनमध्ये नवं जोडपं बुलेटवर फिरायला निघालं; पोलिसांनी अडवताच झालं असं काही..., पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:52 PM2021-05-12T12:52:19+5:302021-05-12T14:36:50+5:30
Viral Video : आता एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करताना दिसून येत आहेत. नियम मोडत असलेल्या नागरिकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आता एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
#COVID प्रोटोकॉल का पालन कर नव विवाहित बाइक से घर जा रहे थे. पुलिस ने घर के बड़े की तरह बधाई व नेग दिया.
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 11, 2021
Beautiful Gesture from #Khaakhi.
(video perhaps from Punjab)
VC-SM pic.twitter.com/AqOFO7n4f1
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता जोडप्याला पोलिसांनी (Police congratulate to newly married couple for following covid protocols video viral) शाबासकी दिली आहे. पोलिस दुचाकीवरून निघालेल्या या नवविवाहित जोडप्याला शाबासकी देतात कारण कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे या दोघांनीही पोलिसांचे मन जिंकले आहे. पोलिसांनी आधी हार घालून जोडप्याचा सत्कार केला. इतकंच नाही तर शुभेच्छा म्हणून रक्कमही दिली. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेकांनी कौतुकस्पद कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या जोडप्याला मान सन्मान देऊन तसेच त्यांना पैसे देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसांच्या याच कृतीमुळे हा व्हिडीओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे. बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. कुटुंबातील ६ लोक एकाच एकाच बाईकवर बसून लग्नाला जात होते. आता तुम्ही म्हणाल दोन सीट्सच्या बाईकवर इतके लोक कसे काय बसतील? हा फोटो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं होतं की, 'लग्नाला जायचं होतं म्हणून मास्क लावला आणि #Roadsefty ला ठेंगा'.
समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब कर्फ्यूच्या काळात एका लग्नाला हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांना त्यांना अडवलं. या सगळ्यांनी मास्क तर लावले होते. पण सोशल डिस्टेंसिंग आणि वाहतुकीच्या नियमांना मात्र चांगलंच धाब्यावर बसवलं होतं. पोलिसांनी सुरूवातीला या लोकांना हात जोडले. त्यानंतर चालान कापून चालकाची समजूत काढून त्याला घरी पाठवण्यात आलं.