Viral Rhino Video: सत्य की 'जुमांजी' चित्रपटातील दृष्य! घराबाहेर धावताना दिसला गेंडा; लोकांची उडाली भांबेरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:28 PM2022-08-09T14:28:49+5:302022-08-09T14:29:55+5:30
Viral Rhino Video: तुमच्यापैकी अनेकांनी 'जुमांजी' चित्रपट पाहिला असेल, यात एक भलामोठा गेंडा शहरात धावताना दाखवण्यात आला होता. तशीच एक घटना घडली असून, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Rhino Video: तुमच्यापैकी अनेकांनी 'जुमांजी' चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात एका गेममधून जंगली प्राणी बाहेर येऊन शहरात नासधूस करताना दिसतात. चित्रपटात एक भलामोठा गेंडाही दाखवण्यात आला होता. तशाच प्रकारचे दृष्य एका शहरात पाहायला मिळाले आहे. शहरी भागात रस्त्यावर भलामोठा गेंडा पळतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक् झाले आहेत. IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर या गेंड्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओत तुम्हाला एक गेंडा रस्त्यावर वेगाने धावताना दिसत आहे. गेंडा धावत येत असल्यामुळे रस्त्यावर कोणीही व्यक्ती नव्हता. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका व्यक्तीने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठल्या शहरातला आहे, हे स्पष्ट झाले नाही.
पहा व्हिडिओ:
When the human settlement strays into a rhino habitat…
— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 5, 2022
Don’t confuse with Rhino straying in to a town pic.twitter.com/R6cy3TlGv1
हा व्हिडिओ ट्विटरवर 76 हजारांहून अधिक व्ह्यूजसह व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी लोकांच्या आणि त्या गेंड्याच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली. जंगलात शहरे वसवली जात असल्यामुळे प्राणी शहरात येतात, असे मत काहींनी व्यक्त केले. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “हे जुमांजी चित्रपटातील दृश्य आहे.” दुसऱ्याने लिहिले, “अरे देवा, हे खरोखरच भयानक आहे!” अशीच एक घटना गेल्या वर्षी 22 डिसेंबरला आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात घडली होती.