Shocking news : खळबळजनक! फक्त ४ किलोमीटर अंतरासाठी एम्ब्यूलेंस चालकानं घेतलं १० हजार भाडं; पावतीचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 10:27 AM2021-05-02T10:27:31+5:302021-05-02T10:43:18+5:30
ambulance charges rs 10000 Viral News : जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाचा बाजार बनवत पैसे उकळून आपले खिसे भरायला सुरूवात केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे बेड्सची कमतरता, ऑक्सिजनची टंचाई, औषधं उपलब्ध नसणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळात काहीजण मदतीचा हात पुढे करत आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाचा बाजार बनवत पैसे उकळून आपले खिसे भरायला सुरूवात केली आहे. अशातच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
Ten thousand rupees for a distance of four kms. Ambulance rental in Delhi.
— Arun Bothra (@arunbothra) April 28, 2021
The world is watching us today. Not only the devastation but also our moral values. pic.twitter.com/dZoJpSbF6c
रुग्णवाहिकेच्या चालकानं कोरोना रुग्णांच्या स्थितीचा फायदा घेत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता फक्त ४ किलोमीटरवर नेण्यासाठी १० हजार रूपये भाडं वसूल करण्यात आलं आहे. ही पावती डी के एम्ब्यूलेंस सर्विसची असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....
आतापर्यंत ६३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या ट्विटवर लोकांनी संतापजनक कमेंट्स केल्या असून काहींना आपले अनुभव शेअर केले आहेत. या घटना व्हायरल होताच संकटातून बाहेर येण्यासाठी कठीण काळात सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं हा संदेश दिला जात आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं