Viral Signature : 'ही स्वाक्षरी आहे का साळिंदर?'; वैद्यकीय अधिकाऱ्याची सही पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:17 PM2022-03-23T13:17:43+5:302022-03-23T13:17:54+5:30
Viral Signature : अनेकवेळा आपल्याला डॉक्टरांचे हस्ताक्षर कळत नाही, अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
तुम्ही अनेकदा चित्रविचित्र हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी पाहिल्या असतील. प्रत्येकाचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी वेगली असते. बहुतेकवेळा आपल्याला डॉक्टरांचे हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी कळत नाही. अशाचप्रकारची एक स्वाक्षरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेजमधील एका अधिकाऱ्यासारखी ही स्वाक्षरी पाहून अनेकजण चक्रावून गेले तर, काहीजण या स्वाक्षरीची तुलना साळींदरासोबत करत आहेत.
साळींदराच्या काट्यांसारखी सही
इंटरनेटवर सध्या ही अजब स्वाक्षरी व्हायरल होत आहे, ज्याची ना सुरुवात कळतीये ना शेवट. गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याची ही स्वाक्षरी आहे. या सहीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे. व्हायरल होणाऱ्या या स्वाक्षरीचा फोटो पाहून तुम्हाला काही क्षण साळींदर नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. ही स्वाक्षरी साळींदराच्या काट्यांसारखीच दिसत आहे.
I have seen many signatures but this one is the best. pic.twitter.com/KQGruYxCEn
— Ramesh 🇮🇳 🚩 (@Ramesh_BJP) March 20, 2022
स्वाक्षरी तुफान व्हायरल
रमेश नावाच्या एका युझरने स्वाक्षरीचा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झाला. हा फोटो शेअर करताना ट्विटर युझरने म्हटलं आहे की, "माझ्या आयुष्यात अशी उत्कृष्ट स्वाक्षरी कधीच पाहिली नाही." गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅड हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभाग आणि रजिस्ट्राराच्या स्टॅम्पसह ही सही व्हायरल झाली आहे, ज्यावर 4 मार्च 2022 ही तारीख आहे.
It looks like a procupine 😅 pic.twitter.com/JhdgvgVSwD
— Swapnil (@Unsubtle_og) March 21, 2022
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एक युझरने याची तुलना साळींदरासोबत केली, तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, कदाचित हा अधिकारी पेन टेस्ट करत असावा. आणखी एका युझरने म्हटले की, बँक व्हेरिफिकेशनमध्ये तो साळींदरासारख्या स्वाक्षरीचे काटे मोजत असावा. ही स्वाक्षरी करणाऱ्याला सीक्रेट सर्व्हिसमध्ये पाठवण्याचा सल्ला एका युझरने दिला.