ऐन दिवाळीत दिल्लीतील प्रदूषणात प्रचंड वाढ,दोन तरुणांनी रचलेलं प्रदूषणावरील गीत होतंय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 04:46 PM2023-11-14T16:46:31+5:302023-11-14T16:47:28+5:30
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रंचड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Viral Video: दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली आहे.त्यामुळे प्रदूषित हवेचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. याआधीही सोशल मीडियावर दिल्लीतील प्रदूषणाची वस्तुस्थिती दर्शवणारे फोटोज आणि व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यातच आता अशा स्थितीत दोन तरुणांनी राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर भाष्य करणारे एक गाणे रचले असून, ते सर्वांच्या पसंतीस उतरले आहे.
दिल्ली एनसीआर परिसरातील प्रदूषणाची माहिती देणारं हे गाणं उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील में 'तुम्हे दिल्लगी भूल जानी पड़ेगी या गाण्याचं व्हर्जन आहे. या गाण्याला दोन तरुणांनी रचलं असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धूमाकूळ घालत आहे.
एका एक्स इंस्टाग्राम वापरकर्त्यांने ९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर केला आहे.त्यांनी या व्हिडीओला एक मजेशीर कॅप्शनदेखील दिली आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच संपूर्ण देशभरात प्रदूषणाने डोकं वर काढलं आहे. दरवर्षी हिवाळ्याआधी राजधानी दिल्लीची हवा खराब होणं हे प्रकरण काही नवं नाही. पण मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा दिल्ली एनसीआर परिसरात नागरिकांना श्वास घेणं अवघड झालं आहे. या संपूर्ण परिस्थितीवर उपहासात्मक टीका करणारं जबरदस्त गाणं तरुणांनी बनवलं. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. शिवाय आतापर्यंत या व्हिडीओला १३ लाख व्यूज आणि ८१ हजार लाईक्स मिळाले आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हे दोन तरुण गिटार आणि हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. या गाण्याची सुरुवात त्यांनी अशी केली आहे – बदल रही दिवाली है। ये काली चादर हर जगह, और खासी बनी कव्वाली है। तुम्हे क्लीन हवा भूल जानी पड़ेगी, दिल्ली एनसीआर में आकर तो देखो। आ... मत जाना। अस्थमा, ब्रोंकाइटिस से फिर ना बचोगे बिल हॉस्पिटल का घटा कर तो देखो। तुम्हे क्लीन हवा भूल जानी पड़ेगी... वोट मांगने जो नेता आते थे घर में, फोन उनको तुम अब मिलाकर तो देखो.... बाकी तुम्ही सोशल मीडिया साईट्सवर या संपूर्ण गाण्याचा आनंद घेऊ शकता.
येथे पाहा व्हिडीओ: