Viral Tiger Video: शॉकिंग! वाघाला जवळून बघायला गेले, तेवढ्यात वाघाने केला हल्ला...पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:52 PM2022-11-28T15:52:11+5:302022-11-28T15:53:15+5:30
Viral Tiger Video:IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी ट्विटरवर हा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे.
Viral Tiger Video: तुम्ही एकमद मजेत जंगल सफारीचा आनंद घेत आहात अन् अचानक एक वाघ तुमच्या दिशेने धावत येतो...अशा वेळेस तुम्ही काय कराल? साहजिकच तुम्ही घाबराल-ओरडाल आणि पळून जाण्याचा प्रयत्न कराल. पर्यटकांच्या एका ग्रुपसोबत असेच काहीसे घडले आहे. वाघाला पाहण्यासाठी हा ग्रुप वाघाच्या अगदी जवळ गेला अन् पुढे...
या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एका ओपन सफारी जीपमध्ये काही पर्यटक वाघाला पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेल्याचे दिसत आहे. समोर झाडांमध्ये एक वाघ लपलेला आहे, सुरुवातीला तो दिसत नाही. पण, काही सेकंदानंतर तो वाघ अचानक झाडातून बाहेर येतो आमि गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
Sometimes, our ‘too much’ eagerness for ‘Tiger sighting’ is nothing but intrusion in their Life…🐅#Wilderness#Wildlife#nature#RespectWildlife#KnowWildlife#ResponsibleTourism
— Surender Mehra IFS (@surenmehra) November 27, 2022
Video: WA@susantananda3@ntca_indiapic.twitter.com/B8Gjv8UmgF
वाघ जवळ येताच गाडीतील सर्वजण घाबरून ओरडायला लागतात. तेवढ्यात वाघ परत पळून जातो. IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधी-कधी वाघाला जवळून पाहण्याची आपली उत्सुकता त्यांच्यासाठी घुसखोरी आहे.' आतापर्यंत हा व्हिडिओ 16 हजारपेक्षा जास्त वेळेस पाहिला गेला आहे. अनेक जण या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.