बापरे! चक्क झाडूचा वापर करून साफ केला डोसा बनवायचा तवा,व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 02:31 PM2023-11-16T14:31:45+5:302023-11-16T14:33:11+5:30

डोसा बनवण्यासाठी लागणारा तवा स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर;व्हिडिओ व्हायरल.

viral video about dosa tawa cleaned by broom by chef and reaction of users | बापरे! चक्क झाडूचा वापर करून साफ केला डोसा बनवायचा तवा,व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

बापरे! चक्क झाडूचा वापर करून साफ केला डोसा बनवायचा तवा,व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

Viral Video: आजच्या घडीला धकाधकीच्या जीवनात प्रत्येकावर बाहेरील स्ट्रीट फूड खाण्याची वेळ येते. परंतु हे पदार्थ व ते बनविण्याची पद्धत, जागा, तेथील स्वच्छता या सर्व बाबींबद्दल मनात नेहमीच प्रश्न उपस्थित होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डोसा खाण्यासाठी खवय्यांची लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. 

देशभरात रस्त्यांवर, चौकात सहज उपलब्ध होणारे तसेच खाद्यप्रेंमींचे आवडते स्ट्रीट फूड म्हणजे डोसा. हा साऊथ इंडियन पदार्थ अनेकांना आवडतो. लोक अगदी चवीने हा पदार्थ खातात. सांबर, नारळाची चटणी अशा वेगवेळ्या व्हेरायटीजमध्ये उपलब्ध होणारा डोसा अनेकांची पहिली पसंती असते. एका कॅफेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कॅफेमधील शेफ चक्क डोसा बनवण्यासाठी लागणारा तवा स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून खाद्यप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडिओ बंगळुरूमधील एका कॅफेमधील असल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडिओत नेमके काय?

हा व्हायरल  व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार होताना दिसत आहे. डोसा तवा साफ करण्यासाठी लांब झाडूचा वापर का केला जातो? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये त्या कॅफेमधील डोसा बनविणारा शेफ सुरूवातीला पाईपच्या साहाय्याने तवा धुऊन नंतर त्यावर झाडू फिरवताना दिसत आहे. डोसा तवा साफ करण्यासाठी झाडूचा उपयोग करु नका, अशी विनंती या यूजरने केली आहे. आम्हाला माहिती आहे की, तुम्ही तवा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु तुमची पद्धत चुकीची आहे. खाण्याचे पदार्थ बनवताना झाडू, ब्रश अशा वस्तुंचा वापर करणे चुकीचे आहे. त्याऐवजी तुम्ही कस्टम ब्रशचा वापर करू शकता, अशा अनेक प्रतिक्रिया आणि सूचना या व्हिडिओखाली युझर्सनी केल्या आहेत. तर दुसऱ्या एका युझरने खोचक कमेंट करत कॅफेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. हे सगळे हायटेक आहे. मला आशा आहे की, कॅफे बंद झाल्यानंतर तवा साफ करण्यासाठी झाडूचा वापर करणे टाळले जाईल. 

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत तब्बल १.५ कोटी नेटकऱ्यांनी पाहिला असून, एक लाखापेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

Web Title: viral video about dosa tawa cleaned by broom by chef and reaction of users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.