VIDEO : हेच राहिलं होतं! वडिलांच्या अस्थी नेण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये स्मशानभूमीतच प्रॉपर्टीवरून जोरदार भांडण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:47 PM2021-05-06T13:47:11+5:302021-05-06T13:48:20+5:30
Social Viral : वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेची भीलवाडामध्ये चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.
कोरोना काळात राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडामधून (Bhilwada) रक्ताच्या नात्यावर काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीवरून तीन भाऊ स्मशानभूमीतच आपसात (Brother Fight) भिडले. हे काही सामान्य भांडण नव्हतं तर तिघांनीही एकमेकांवर चपला आणि बुक्यांचा मारा केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थिती सांभाळली.
यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला. व्हायरल व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेची भीलवाडामध्ये चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. (हे पण वाचा : बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....)
भीलवाडाचं उपनगर सांगानेर पोलीस स्टेशनचे प्रभारी देवीलाल यांनी सांगितले की, येथील वयोवृद्ध प्रताप रावचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी त्यांची तीन मुले धर्म सिंह राव, पप्पू राव आणि रघुनात राव अस्थी वेचण्यासाठी स्मशानभूमीत गेले होते. दरम्यान काळ वेळ, परिस्थीती विसरून तिघेही भाऊ कौटुंबिक प्रॉपर्टीवरून आपसात भिडले.
बघता बघता तिघेही एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारू लागले होते. दरम्यात तिथे एका दुसऱ्य अंत्यसंस्कारासाठी काही लोक आले होते. त्यांनी या तीन भावांचं भांडण सोवण्याचा प्रयत्न केला. पण काही होऊ शकलं नाही. नंतर काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना वेगळं केलं. त्यांना समजावून घरी परत पाठवण्यात आलं.