VIDEO : चालत्या रिक्षाचा बदलला टायर; 'या' पोरांचा स्टंट पाहून नेटकरीही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 02:52 PM2019-09-14T14:52:31+5:302019-09-14T14:53:00+5:30
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून लाइक आणि शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडीओ हैराण करणारे असतात, तर अनेक व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही.
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून लाइक आणि शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडीओ हैराण करणारे असतात, तर अनेक व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने चालत्या रिक्षाचा टायर बदलला आहे. हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हम चदंरयान का लैडर भी ठीक कर लेगे 👶😁 pic.twitter.com/kPuhfh79E1
— HarrY 🚩 (@harisbhadra) September 11, 2019
व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, एका रिक्षाचा टायर रिक्षा सुरू असतानाच पंक्चर होतो. त्यानंतर चालक रिक्षा दोन टायरवर चालवत राहतो आणि मागे बसलेली एक व्यक्ती रिक्षा सुरू असतानाच टायर चेंज करू लागतो. त्या रिक्षाच्या मागे गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. रिकाम्या रस्त्यावर रिक्षा तालवत असताना तो पंक्चर टायर काढतो आणि दुसऱ्या रिक्षामधून एक व्यक्ती येऊन त्याला टायर देते.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड शेअर केला जात आहे. ट्विटरवर एका यूजरने व्हिडीओ शेअर करून कॅप्शन लिहिलं आहे की, आपण चंद्रयानचं लँडरही नक्कीच ठिक करू'
व्हायरल होणारा हा व्हिडीओ फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. कमेंट सेक्शनमध्ये काही लोक हा व्हिडीओ भारतातील नसून परदेशातील आहे असं सांगत आहेत. तर अनेक लोक हा स्टंट जीवघेणा ठरू शकतो. प्लीझ कोणीही करण्याचा प्रयत्न करू नका अशी विनंती करत आहेत.