VIDEO : जंगलात हरवलं हत्तीचं पिल्लू, तीन सिंहांनी केला पाठलाग आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:26 PM2023-09-29T15:26:05+5:302023-09-29T15:26:16+5:30
Viral Video : हा व्हिडीओ मुळात ब्रेंट श्नुप्प (Brent Schnupp) द्वारे दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्क (Kruger National Park, South Africa) मध्ये शूट करण्यात आला.
Baby Elephant And Lions Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील काही गमतीदार तर काही हैराण करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हत्तीच्या एका पिल्लाची सिंहांची टोळी शिकार करताना दिसत आहे. लेटेस्ट साइटिंग्सच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ मुळात ब्रेंट श्नुप्प (Brent Schnupp) द्वारे दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्क (Kruger National Park, South Africa) मध्ये शूट करण्यात आला.
आधी तर हा व्हिडीओ फारच शांततापूर्ण वाटत होता, अशात एक सिंह दोन इतर सिंहांसोबत रस्ता पार करत होता. त्यांना आपल्या कळपातून हरवलेलं एक हत्तीचं पिल्लू दिसलं. ते त्याच्या मागे लागले.
व्हिडीओ शूट करणाऱ्या ब्रेंट श्नुप्पने खुलासा केला की, स्थिती पाहून असं वाटलं की, हत्तीणीने आपल्या पिल्लाला सोडलं. सिंहाने त्या पिल्ल्याचा पाठलाग केला. पण मोठ्या सिंहाला आणि सिंहीणीला कमी इंटरेस्ट दिसला.
व्हिडिओत एक हत्तीचं पिल्लू आपल्या आईचा शोध घेत आहे. ज्याच्यामागे तीन सिंह आहेत. सुदैवाने हत्तीचं पिल्लू पळून जाण्यात यशस्वी ठरतं. 26 सप्टेंबरला शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत.