जबरदस्त! बैलाचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी कधी पाहिला नसेल, एकदा बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:39 PM2020-06-23T15:39:25+5:302020-06-23T15:43:55+5:30

बैलाचा एक भारी व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेमकं काय आहे ते तुम्ही क्लिक करूनच बघा.

Viral video of bailgadi will make you feel love with this ox | जबरदस्त! बैलाचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी कधी पाहिला नसेल, एकदा बघाच....

जबरदस्त! बैलाचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी कधी पाहिला नसेल, एकदा बघाच....

Next

कधीकाळी गावात बैलागाडी हे महत्वाचं वाहतुकीचं साधन होतं. शेताच्या कामातही बैलगाडी महत्वाची होती. बैल हा शेतकऱ्यांचा खास मित्र. आजही ग्रामीण भागात बैलगाडी बघितली जाऊ शकते. पण प्रमाण कमी झालंय. मात्र आपल्या पूर्वजांची शेतात मदत या बैलांनीच सर्वात जास्त केली. आता तुम्ही म्हणाल पोळा नाही काही नाही तर बैलाचा विषय कशाला? तर बैलाचा एक भारी व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेमकं काय आहे ते तुम्ही क्लिक करूनच बघा. 

वेस्ट दिल्लीचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी याला कॅप्शन दिलंय की, 'Mesmerising, म्हणजे मंत्रमुग्ध'. आतापर्यंत या व्हिडीओला 90 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियात आपण नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ, फोटो बघत असतो. पण बैलाचा इतका भारी व्हिडीओ याआधी तुम्ही कधी पाहिला नसेल.

साधारणपणे एक व्यक्ती बैलाला बैलगाडीला जुंपतो म्हणजे बांधतो. पण या व्हिडीओत एक सुंदर, रांगडा बैल स्वत:च बैलगाडी खांद्यावर घेतो आणि पुढे जातो. हीच या बैलाची खासियत आहे. त्यामुळेच लोकांना हा व्हिडीओ फार पसंत पडतोय. कारण पहिल्यांदाच बैलाचा असा व्हिडीओ त्यांनी पाहिलाय.

या व्हिडीओवर अनेकजण चांगल्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, या बैलाकडून आपण काही शिकलं पाहिजे. काही जण यावर टीकाही करत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडीओ पसंत पडत आहे आणि ते जास्तीत जास्त शेअरही करत आहेत. 

Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Web Title: Viral video of bailgadi will make you feel love with this ox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.