VIDEO : आपल्या तीन मुलांना बघू शकत नाही हे आई-वडील, परिवाराला बघून भावूक झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:58 AM2023-11-24T10:58:37+5:302023-11-24T10:59:18+5:30

Viral Video : सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. यातील आई-वडील बघू शकत नाहीत. त्यांच्यासोबत त्यांची तीन मुले आहेत.

Viral Video : Blind parents travelling with three in Delhi metro viral video | VIDEO : आपल्या तीन मुलांना बघू शकत नाही हे आई-वडील, परिवाराला बघून भावूक झाले लोक

VIDEO : आपल्या तीन मुलांना बघू शकत नाही हे आई-वडील, परिवाराला बघून भावूक झाले लोक

Metro Viral Video : कोणत्याही आई-वडिलांसाठी आपल्या मुलांपेक्षा जास्त मोठं काहीच नसतं. मुलांच्या जन्मापासून ते मोठे होईपर्यंत अशा अनेक आठवणी असतात ज्या शब्दात बांधता येत नाहीत. पण जरा असा विचार करा की, जर आई-वडील आपल्या मुलांना बघूच शकत नसतील तर? त्यांना काय वाटत असेल. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तीन लहान मुलं आपल्या नेत्रहीन आई-वडिलासोबत प्रवास करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. यातील आई-वडील बघू शकत नाहीत. त्यांच्यासोबत त्यांची तीन मुले आहेत. ते बघू शकतात. हा व्हिडीओ दिल्लीच्या मेट्रोतील आहे. लोक म्हणाले की, हा परिवार अशा स्थितीतही किती आनंदी आहे. मग आपण आपल्या जीवनातील समस्यांसमोर कसे हात टेकवतो. 

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ (@salty_shicha_official) नावाच्या यूजरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी शिचा आहे. आज ऑफिसमधून घरी जात होते. एका मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रो हेल्पर आला आणि त्याने या परिवाराला विशेष जागा मिळवून दिली. या परिवातील मुख्य पुरूष आणि महिला नेत्रहीन आहे.

त्यांना तीन मुले आहेत. जे बघू शकतात. ही मुले आनंदी आहेत. सोबतच त्यांना मेट्रोमधून प्रवास करणं आवडत आहे. ते या क्षणाचा आनंद घेत आहेत. या परिवाराला पाहून मला सकारात्मकता मिळाली. आपण आहोत जे नेहमीच प्रत्येक गोष्टीची तक्रार करत असतो. स्वत:ला स्वीकारा आणि जगा.

17 नोव्हेंबरला शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 13 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच बरेच लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी देवाकडे प्रार्थना केली की, या परिवाराला आनंदी आणि सुरक्षित ठेव.

Web Title: Viral Video : Blind parents travelling with three in Delhi metro viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.