Video - वडिलांचा व्यवसाय ठप्प; लेकानं शक्कल लढवली; दुकानासमोर ग्राहकांची लांबच लांब रांग लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:37 PM2022-04-19T15:37:29+5:302022-04-19T15:39:48+5:30

Viral Video : वडिलांच्या व्यवसाय ठप्प झाल्यावर मुलाने शक्कल लढवली अन् आता दुकानासमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे.

viral video boy applied strong trick to run father business in telangana hyderabad | Video - वडिलांचा व्यवसाय ठप्प; लेकानं शक्कल लढवली; दुकानासमोर ग्राहकांची लांबच लांब रांग लागली

फोटो - india.com

Next

नवी दिल्ली - सध्याच्या काळात ज्या लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी योग्य संधी मिळत नाही त्यांच्यासाठी सोशल मीडिया एक वरदान ठरलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात कोण, कसं प्रसिद्ध झालं अशा बातम्या आपण रोज ऐकतो. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लहान मुलगा आपल्या वडिलांचा व्यवसाय कसा वाढवत आहे, हे पाहायला मिळत आहे. वडिलांच्या व्यवसाय ठप्प झाल्यावर मुलाने शक्कल लढवली अन् आता दुकानासमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे. 

लहान मुलाचा हा व्हिडीओ तेलंगणातील असून तो अत्यंत लोकप्रिय झाला आहे. तेलंगणामध्ये मोहम्मद इलियास नावाच्या व्यक्तीचे हलीमचं दुकान आहे. मात्र या इफ्तारच्या निमित्ताने अपेक्षेप्रमाणे विक्री होत नसल्याने इलियास नाराज झाला. त्यांनी या संदर्भात सांगितले की, "इफ्तारच्या वेळी विक्री न झाल्यामुळे मी अस्वस्थ होतो, पण माझ्या मुलाने माझ्या दुकानाची जाहिरात करण्यासाठी व्हिडीओ बनवताच तो व्हायरल झाला आणि ग्राहकांनी माझ्या दुकानासमोर गर्दी केली."

सानिया मिर्झाची बहीणही याच दरम्यान दुकानात दिसली. आम्ही लवकरच डिलिव्हरी सेवा देखील सुरू करू, असं देखील मोहम्मद इलियासने सांगितलं आहे. वडिलांच्या हलीमच्या व्यवसायाला गती देण्यासाठी मोहम्मद अदनान नावाच्या मुलाने सोशल मीडियावर त्याची जाहिरात केली, त्यानंतर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. 

अदनानने "पूर्वी 10 प्लेटही विकणे कठीण होते आणि आता आम्ही 150 प्लेट्स विकतोय…" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या दुकानातील सर्व वस्तू दाखवताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाचे आणि त्याच्या दुकानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सर्वत्र या मुलाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.


 

Web Title: viral video boy applied strong trick to run father business in telangana hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.