भन्नाट जुगाड!! रस्त्यावर आंबे विकण्यासाठी चिमुरड्याने लढवली अफलातून शक्कल (Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 09:15 PM2023-05-24T21:15:16+5:302023-05-24T21:15:59+5:30
Boy selling mangoes Dance, Viral Video: आंबे विकण्याची अशी पद्धत तुम्ही कधी पाहिलीये का?
Boy Dancing Near Cart To Sell Mango, Viral Video: प्रत्येकजण आयुष्यात कठोर परिश्रम करतो. पण हल्ली काही लोक 'स्मार्ट वर्क' करून मेहनत करणाऱ्यांसारखेच परिणाम मिळवतात. अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला त्याच्या आंब्याच्या स्टॉलजवळ हायवेवरून जाणारी वाहने थांबवण्याचा एक अतिशय स्मार्ट मार्ग सापडला आहे. होय, या मुलाची स्टाईलच अशी आहे की हे प्रकरण ट्विटरवर चर्चेचा विषय बनले आहे.
मुलाने लढवली अनोखी शक्कल
ही क्लिप 25 सेकंदांची आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की पिवळा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला मुलगा हायवेच्या बाजूला नाचत आहे. त्याच्या नृत्याच्या हालचाली वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला थांबण्यास आमंत्रित करतात. अनेक वाहने न थांबता पुढे जातात, पण गाडी थांबली की मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. कारण त्याची स्टाइलच वेगळी असते.
A boy is dancing near a mango cart trying to get the attention of motorists (customers) in Yelawal along Mysuru-Madikeri National Highway. Dozens of such carts are lined up in the stretch during mango season.
— Kodagu Connect (@KodaguConnect) May 23, 2023
(VC: Chetan Gowda) pic.twitter.com/eEepJSztyd
'जीवन एक सर्कस आहे...' असे अनेकांचे म्हणणे आहे. २३ मे रोजी ट्विटर युजरने @KodaguConnect या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. येलावल म्हैसूर-मडीकेरी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आंबा स्टँडजवळ एक मुलगा नाचून कार्टर्स (ग्राहकांचे) लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. आंब्याच्या हंगामात असे डझनभर फेरीवाले महामार्गावर रांगा लावतात, असे कॅप्शनही त्याने दिले आहे. या व्हिडिओला 13 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 250 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी कमेंटमध्ये कौतुक केले आहे. एका व्यक्तीने लिहिले की मी मुलाच्या समर्पणाचे कौतुक करतो. परंतु ही पद्धत सुरक्षित नाही. तर दुसऱ्याने लिहिले की जीवन एक सर्कस आहे. तर काही युजर्सनी या मुलाची कल्पना आणि त्याचा डान्स या दोघांचेही कौतुक केले.