VIDEO : रिवाजानुसार छडीने हळूहळू मारता मारता दिराने खरंच नव्या वहिनीची केली धुलाई, नवरदेव पेटला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 03:34 PM2021-08-06T15:34:46+5:302021-08-06T15:42:42+5:30

हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे हे स्पष्ट होऊ शकलेल नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे.

Viral video : Brother in law beats up sister in law during marriage ritual funny video goes viral | VIDEO : रिवाजानुसार छडीने हळूहळू मारता मारता दिराने खरंच नव्या वहिनीची केली धुलाई, नवरदेव पेटला आणि....

VIDEO : रिवाजानुसार छडीने हळूहळू मारता मारता दिराने खरंच नव्या वहिनीची केली धुलाई, नवरदेव पेटला आणि....

Next

देशातल्या वेगवेगळ्या भागात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज असतात. जे अनेकदा फार मजेदारही होतात. सोशल मीडियावर लग्नाच एक असाच रितीरिवाज करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रिवाज म्हणून छडीने दीर नव्या नवरीला मारता मारता खरंच मारू लागतो. यानंतर नवरदेवा संतापतो आणि आपल्या भावाची धुलाई करतो.

हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे हे स्पष्ट होऊ शकलेल नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकजण हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तसेच काही लोकांनी अशाप्रकारच्या रिवाजांवर प्रश्नही उपस्थित केले आहे, ज्यात नवरीला मारलं जातं.

...आणि वहिनीला खरंच मारू लागला दीर

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, दीर आणि वहिनी एकमेकांना प्रतिकात्मक रूपाने मोराच्या पिसाने मारताना दिसत आहे. सुरूवातीला तर सगळं काही ठिक होतं. पण अचानक दीर वहिनीला जोरजोरात मारू लागतो. हळूहळू मारता मारता तो तिला जोरात मारू लागतो.

अचानक घडलेला हा प्रकार पाहून सगळेच हैराण होतात. नवरीच्याही लक्षात येत नाही की, नेमकं काय झालं. ते मागे सरकू लागते. अशात रागावलेला नवरदेवा तिथे येतो आणि आपल्या भावाची धुलाई करतो. व्हिडीओत बघू शकता की, धावत आलेला नवरदेवा भावाच्या अंगावर जातोय आणि त्याला मारतो. 
 

Web Title: Viral video : Brother in law beats up sister in law during marriage ritual funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.