सिगारेटची सवय कशी पडते महागात? बघा एका आर्टिस्टने तयार केलेला हा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:18 PM2018-11-27T15:18:04+5:302018-11-27T15:18:39+5:30
'इस शहर को ये क्या हुओ' ही धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगणारी जाहिरात सिनेमागृहात लागली की, लोक इकडे तिकडे मान फिरवू लागतात.
'इस शहर को ये क्या हुओ' ही धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगणारी जाहिरात सिनेमागृहात लागली की, लोक इकडे तिकडे मान फिरवू लागतात. यात दाखवली जाणारी दृश्य अनेकांकडून पाहिली जात नाहीत. पण सध्या सोशल मीडियात असे काही व्हिडीओ गाजत आहेत. या व्हिडीओजमध्ये धुम्रपानामुळे काय होतं हेच दाखवण्यात आलं आहे. पण फारच कलात्मक पद्धतीने. त्यामुळेच हे व्हिडीओ सध्या गाजत आहेत.
हे व्हिडीओ तयार करणाऱ्या आर्टिस्टचं नाव Dino Tomic असं आहे. त्याने त्याच्या कलेच्या माध्यमातून लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे. याला गन पावडर आर्ट म्हटलं जातं.
डिनोच्या इन्स्टाग्राम पेजवर असे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कलाकृती तयार करण्यासाठी तो गन पावडरचा वापर करतो.
डिनोने केवळ गन पावडरनेच कलाकृती केल्या असे नाही तर त्याचे वॉटर आर्टही चांगलेच लोकप्रिय आहेत.