Cheating Wife : बोंबला! नवरा कामावर गेल्या गेल्या प्रियकराला घरी बोलवायची; लपवलेल्या कॅमेरानं पितळ उघडं पाडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:40 PM2021-04-27T13:40:52+5:302021-04-27T13:47:38+5:30

Viral video cheating wife : सीसीटिव्ही कॅमेरात या महिलेची सगळी चुकीची कृत्य कैद झाली आणि ती चांगलीच अडकली आहे. आपल्या अफेअरबद्दल पतीला कळेल अशी कल्पनासुद्धा या महिलेनं केली नव्हती. 

Viral video cheating wife caught in act hidden camera revelaed boyfriend when husband enters | Cheating Wife : बोंबला! नवरा कामावर गेल्या गेल्या प्रियकराला घरी बोलवायची; लपवलेल्या कॅमेरानं पितळ उघडं पाडलं

Cheating Wife : बोंबला! नवरा कामावर गेल्या गेल्या प्रियकराला घरी बोलवायची; लपवलेल्या कॅमेरानं पितळ उघडं पाडलं

googlenewsNext

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.  काही व्हिडीओमुळे लोक आश्चर्यचकीत होतात. तर काही व्हिडीओ पोल खोल करणारे असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पती व्यतिरिक्त इतर पुरूषांसह संबंध असलेल्या महिलांची अनेक प्रकरणं समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. सीसीटिव्ही कॅमेरात या महिलेची सगळी चुकीची कृत्य कैद झाली आणि  ती चांगलीच अडकली आहे. आपल्या अफेअरबद्दल पतीला कळेल अशी कल्पनासुद्धा या महिलेनं केली नव्हती. 

@souljonnyzया ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय -Cheating wife, Caught in the Act; म्हणजेच धोका देणारी पत्नी, रंगेहाथ सापडली. तुमचा विश्वास बसणार नाही पण आपला पती कामासाठी बाहेर जाताच ही पत्नी आपल्या प्रियकराला घरी बोलावून घेत असे. मात्र, तिच्या पतीला याबाबत संशय निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे त्याने पत्नीच्या नकळत घरात कित्येक ठिकाणी कॅमेरे लावले जेणेकरून तो बाहेर गेल्यानंतर पत्नीचं काय चालतं हे त्याला कळू शकेल. 

कॅमेरात कैद झाली संपूर्ण घटना

ज्या दिवशी ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे पती कामावर गेला होता. 
पती बाहेर जाताच महिलेने रोज सारखंच आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. हे दोघं किचनमध्ये रोमान्स करत असतानाच महिलेचा पती घरी परत आला. यावेळी ही महिला किचनच्या ओट्यावर बसलेली तुम्हाला दिसून येईल. यानंतर घाबरलेला प्रियकर किचनमध्येच लपून बसलेला तुम्ही पाहू शकता.

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

इकडे पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र पती किचनमध्येच येण्यावर अडून बसला. यानंतर किचनमध्ये झालेला सगळा प्रकार तिथल्या छुप्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला. दरम्यान ही घटना कुठली आहे, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर  या जोडप्याचा घटस्फोट झाला का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

Web Title: Viral video cheating wife caught in act hidden camera revelaed boyfriend when husband enters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.