VIDEO: मोदीजी, आता तरी कपड्यांची दुकानं उघडा; मराठमोळ्या आईची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:31 PM2020-04-28T16:31:49+5:302020-04-28T16:32:14+5:30
ही आई पंतप्रधान मोदींना कपड्यांचे दुकान उघडण्यास परवानगी द्या अशी विनंती करत आहे.
कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्याासाठी शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत असल्यामुळे पंतप्रधानांनी लोकांना घरी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकान चालू नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी लोकांना गैरसोयीचा सामना करावा आहे. अशात एक व्हिडीओ सध्या टिकटॉकवर व्हायरल होत आहे.
@sujatabpathare Modiji plz Kapdo ki dukan Khulwa do ##gharbaithoindia##outfitinspiration##foryoupage##tiktokindia##kuku##motherdaughter##punerigirl
♬ original sound - Bebu’s Mom
या व्हिडीओत एक आई आपल्या लहान मुलाला हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीचे कपडे घालत आहे. हे करत असताना ही आई पंतप्रधान मोदींना कपड्यांचे दुकान उघडण्यास परवानगी द्या अशी विनंती करत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन् महिनाभरात केलं असं काही, की थेट तंबूत राहायला जावं लागलं)
या व्हिडीयोला आत्तापर्यंत ५.१ मिलियन व्हिव्हज आणि १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता आईने चिमुकल्यासाठी, त्याचे सगळे कपडे लहान होत आहेत. त्यामुळे प्लीज कपड्यांचे दुकान उघडा अशी विनंती केली आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर सुजाता पाठारे नावाच्या टिकटॉक युजरने शेअर केला आहे. ( हे पण वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)