Viral Reel : नवरोबाचा डान्स पाहून पत्नीने पकडलं डोकं, बघून तुम्हीही पोट धरून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 03:12 PM2023-12-06T15:12:08+5:302023-12-06T15:13:36+5:30
Viral Reel : या रीलमध्ये या कपलने गमतीतून बऱ्याच महिलांच्या किंवा पुरूषांच्या मनातील दु:खं दाखवण्याच्या प्रयत्न केलाय.
Viral Reel : सोशल मीडियावर कपल्सचे अनेक रील्स रोजच व्हायरल होत असतात. यातील काही गमतीदार तर काही इमोशनल करणारे असतात. रील्स बनवण्याची क्रेझ महिला काय, पुरूष काय आणि लहान मुले काय सगळ्यांनाच आहे. अनेक महिलांना अपेक्षा असते की, त्यांच्या जोडीदाराने त्यांच्यासोबत झक्कास रील्स करावेत. पण अनेकदा हा प्रयोग यशस्वी होतोच असं नाही. कधी कधी महिलांच्या अपेक्षांवर असं काही पाणी फेरलं जातं की, त्या डोकं पकडून बसतात. असंच काहीसं या व्हायरल झालेल्या रीलमध्ये बघायला मिळतं. या रीलमध्ये या कपलने गमतीतून बऱ्याच महिलांच्या किंवा पुरूषांच्या मनातील दु:खं दाखवण्याच्या प्रयत्न केलाय.
तुम्ही बघू शकता की, या फोटोत एक फारच आनंदी कपल फुल्ल तयारी करून दिसत आहे. पतीने जबरदस्त सूट घातला आणि तर पत्नीने सुंदर साडी नेसली आहे. आता दोघांनाही डान्सचा रील बनवायचा आहे. पत्नी-पत्नी दोघेही आनंदात दिसत आहे. पत्नीच्या चेहऱ्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे की, दोघांचा हा रील भारी जमणार आहे. अशात 'बादल में बिजली बार बार चमकी....' असे गाण्याचे बोल सुरू होतात. तेव्हाच पती एक भन्नाट डान्स स्टेप सुरू करतो जी बघून पत्नीचा पूर्ण मूड ऑफ झाल्याचं दिसतं.
राहुल कामत नावाच्या इन्स्टा यूजरने रील शेअर केली आहे. या रीलला आतापर्यंत 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 3 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. ज्या फारच मजेदार आहे. या व्हिडिओतील पतीचा डान्स पाहून अनेकांना त्यांच्यासोबत काय झालं हे आठवलं. एकाने कमेंट केली की, हॅंडसम पती चांगला डान्स करेल, पण बालपणीची बुमरो बुमरो डान्सची स्टेप आठवली. तर दुसऱ्याने लिहिलं की, अचानक त्याने वेळ बदलली आणि भावनाही बदलल्या. तिसऱ्याने लिहिलं की, सीरिअस रील बघत होतो. तेव्हा अचानक हा रील बघून हसू लागलो.