मगरीचा नदीच्या पाण्यातून छुपा हल्ला; हरणाने मृत्यूच्या जबड्यातून कसा वाचवला जीव? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:05 PM2023-09-13T14:05:39+5:302023-09-13T14:06:52+5:30

काही वेळी अशक्य वाटत असतानाही आपण त्या संकटावर मात करू शकतो

viral video crocodile chase deer in river water but he manages to escape watch | मगरीचा नदीच्या पाण्यातून छुपा हल्ला; हरणाने मृत्यूच्या जबड्यातून कसा वाचवला जीव? पाहा Video

मगरीचा नदीच्या पाण्यातून छुपा हल्ला; हरणाने मृत्यूच्या जबड्यातून कसा वाचवला जीव? पाहा Video

googlenewsNext

Crocodile Deer Viral Video : जंगल आणि नदी हे दृश्य पाहायला अतिशय निसर्गरम्य वाटते. पण याच निसर्गरम्य अशा ठिकाणचा एक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की संकटात हात पाय गाळून बसलण्यापेक्षा त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे. त्यामुळे काही वेळी अशक्य वाटत असतानाही आपण त्या संकटावर मात करू शकतो.

या व्हायरल क्लिपमध्ये हरण नदी पार करण्यासाठी उंच उडी मारत असल्याचे पाहायला मिळते. मग त्याला कळते की पाण्यात मगरी आहेत. मगर शिकार करण्यासाठी वेगाने हरिणाचा नदीच्या पाण्यात पाठलाग करत असते. अशा स्थितीत मगरीच्या जबड्यातून सुटण्यासाठी हरिण चक्क पाण्यात उंच उडी मारू लागते. एका क्षणी मगरी त्याला खाणार असं वाटत असतानाच, हरिण चपळता दाखवून पटकन मगरीच्या जबड्यातून स्वत:ची सुटका करून घेते आणि नदीच्या काठावर येऊन जंगलात पसार होते. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला असून अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Web Title: viral video crocodile chase deer in river water but he manages to escape watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.