VIDEO : व्हेल माशाच्या या कारनाम्याने सर्वांनाच केलं हैराण, कधीच पाहिलं नसेल माशाचं असं रूप....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 12:51 PM2021-01-16T12:51:36+5:302021-01-16T12:52:07+5:30

या व्हेल माशाच्या तोंडात शेकडो मासे आहेत आणि मग व्हेल मासा आपलं तोंड बंद करून घेतो. व्हेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Viral video of Eden whale fish unique feeding style on Social Media | VIDEO : व्हेल माशाच्या या कारनाम्याने सर्वांनाच केलं हैराण, कधीच पाहिलं नसेल माशाचं असं रूप....

VIDEO : व्हेल माशाच्या या कारनाम्याने सर्वांनाच केलं हैराण, कधीच पाहिलं नसेल माशाचं असं रूप....

googlenewsNext

जगातला सर्वात मोठा मासा व्हेलचे एक थक्क करून सोडणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळत असतात. असाच एका थक्क करणारा व्हेलचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ व्हेल माशाची खाण्याची पद्धत बघितली जाऊ  शकते. हा व्हिडीओ दूरून बघितल्यावर असं वाटतं की, जसं जहाज पाण्यात उलटलंय. पण जेव्हा तुम्ही निरखून बघाल तेव्हा लक्षात येईल की, व्हेल माशाने आपलं तोंड उघडलं आहे.

या व्हेल माशाच्या तोंडात शेकडो मासे आहेत आणि मग व्हेल मासा आपलं तोंड बंद करून घेतो. व्हेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

थायलॅंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.५ बिलियन वेळा पाहिलं गेलंय. हा व्हिडीओ प्रसिद्ध वाइल्डलाईफ फिल्म निर्माता बर्टी ग्रेगोरी यांनी कॅप्चर केलाय. हा व्हिडीओ बीबीसीची डॉक्युमेंट्री  'परफेन्स' चा एका छोटासा भाग आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना ग्रेगोरी यांनी लिहिले की, शिकार करताना एक व्हेल माशाला असाधारण व्यवहार करताना पाहिलं गेलं. निर्मात्याने दावा केला आहे की, हा असामान्य व्यवहार या क्षेत्रातील जल प्रदूषणामुळे आहे. 

व्हेल माशाचा हा अद्भुत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक हा नजारा पाहून थक्क होत आहेत. लोक या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, हा फार हैराण करणारा सीन आहे. अशाप्रकारच्या शेकडो कमेंट यावर येत आहेत.
 

Web Title: Viral video of Eden whale fish unique feeding style on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.