Viral Video : ८ वर्षाच्या मुलाने चालवली फॉर्च्यूनर कार, लोकांचा बसत नाहीये यावर विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 01:26 PM2022-04-28T13:26:17+5:302022-04-28T13:28:00+5:30

Viral Video : 'अयान और अरीबा शो' (Ayan and Areeba Show) नावाच्या एका यूट्यूब चॅनलने तीन आठवड्यापूर्वी हा व्हिडीओ कॅप्शनसोबत शेअर केला होता.

Viral video : Eight year old boy drives fortuner car people cant believe it | Viral Video : ८ वर्षाच्या मुलाने चालवली फॉर्च्यूनर कार, लोकांचा बसत नाहीये यावर विश्वास

Viral Video : ८ वर्षाच्या मुलाने चालवली फॉर्च्यूनर कार, लोकांचा बसत नाहीये यावर विश्वास

googlenewsNext

Pakistan Viral Video: सोशल मीडियावरपाकिस्तानातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका ८ वर्षांचा मुलगा टोयोटा फॉर्च्यूनर एसयूव्ही कार चालवत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा आपल्या १० वर्षाच्या बहिणीसोबत दिसत आहे. मुलीने तिचा आणि तिच्या भावाचा परिचय देत सांगितलं की, ते त्यांच्या गावी आले आहेत. ते दाखवणार आहेत की, तिचा भाऊ ८ वर्षांचा आहे आणि सहजपणे कार चालवतो.

'अयान और अरीबा शो' (Ayan and Areeba Show) नावाच्या एका यूट्यूब चॅनलने तीन आठवड्यापूर्वी हा व्हिडीओ कॅप्शनसोबत शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं होतं की, 'आज आम्ही तुम्हाला दाखवू की, कशाप्रकारे ८ वर्षांचा मलगा टोयोटा फॉर्च्यूनर कार चालवू शकतो. ज्यांनीही अयानला गाडी चालवताना पाहिलं ते हैराण झाले आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. कुणी मुलाचं कौतुक करत आहेत तर काही लोकांनी यावर टिकाही केली आहे.

व्हिडीओत अयान निळ्या रंगाच्या पठाणीत एसयूव्हीचा दरवाजा उघडतो आणि ड्रायव्हिंग सीटवर बसतो. तो एका मैदानात गाडी चालवताना दिसत आहे. उंची कमी असल्याने तो सीटच्या काठावर बसून गाडी चालवत आहे. विचारल्यावर सांगितलं की, तो सहा वर्षांचा असतानापासून गाडी चालवत आहे. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट केली की, 'माशाअल्लाह'. एका दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, 'जर हा भारत असता तर मुलाच्या वडिलाला अटक केली गेली असती.
 

Web Title: Viral video : Eight year old boy drives fortuner car people cant believe it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.