अटक मटक...पाणीपुरी गटक! हत्ती महाशयांना लागली पाणीपुरीची चटक, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:12 IST2022-10-12T14:05:24+5:302022-10-12T14:12:14+5:30
पाणीपुरी खायला कुणाला आवडत नाही. नुसतं नाव जरी घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. याला तर आता चक्क हे हत्ती महाशय देखील अपवाद राहिलेले नाहीत.

अटक मटक...पाणीपुरी गटक! हत्ती महाशयांना लागली पाणीपुरीची चटक, पाहा VIDEO
पाणीपुरी खायला कुणाला आवडत नाही. नुसतं नाव जरी घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. याला तर आता चक्क हे हत्ती महाशय देखील अपवाद राहिलेले नाहीत. पाणीपुरीची आली लहर आणि गजराजांनी केला केला कहर असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलवर हत्तीनं पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये 'गजराज' एकामागून एक पाणीपुरीवर ताव मारताना दिसत आहे.
Looking cute 🥰 #elephant#panipuripic.twitter.com/ChMOzTqixs
— Sekhar (@kksomasekhar) October 11, 2022
केळी आणि उसाचा चाहता असलेल्या 'गजराज'ला पाणीपुरीही आवडते हेही या निमित्तानं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आसाममधील तेजपूरचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला हत्ती एकामागून एक अनेक पाणीपुरी खाताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला एका पाणीपुरी स्टॉलवर हत्ती उभा आहे आणि दनादन एकामागोमाग एक पाणीपुरी खाताना दिसतोय. पाणीपुरीवाले भाऊ पाणीपुरी हत्तीच्या सोंडेत ठेवतात आणि नंतर गजराज पटकन पाणीपुरी गट्टप करतात असं व्हिडिओत दिसत आहे.
मनसोक्तपणे पाणीपुरीवर ताव मारणारा हत्ती पाहून नेटिझन्स देखील चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर होत आहे.