Viral video: आगीत अडकले होते दोन तरूण, बघा कसा वाचवला त्यांनी स्वत:चा जीव; थरारक दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:06 AM2021-12-20T11:06:25+5:302021-12-20T11:06:51+5:30

Manhattan Fire Video : मीडिया रिपोर्टनुसार, व्हायरल व्हिडीओ न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहरातील आहे. असं सांगितलं जात आहे की, एका इमारतीत भयंकर आग लागली होती.

Viral Video : Fire broke out in building then what happened watch shocking video | Viral video: आगीत अडकले होते दोन तरूण, बघा कसा वाचवला त्यांनी स्वत:चा जीव; थरारक दृश्य

Viral video: आगीत अडकले होते दोन तरूण, बघा कसा वाचवला त्यांनी स्वत:चा जीव; थरारक दृश्य

Next

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ शेअर होता असतात. ज्यातील शेकडो व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की बघताच हसू फुटलं तर काही व्हिडीओ बघून हैराण व्हायला होतं. असाच एक हैराण करणारा आणि मनात धडकी (Manhattan Fire Video) भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्या एका क्षणासाठी श्वास रोखला जाईल. दोन लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी जे केलं ते बघून लोक थक्क झाले आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, व्हायरल व्हिडीओ न्यूयॉर्कच्या (New York) मॅनहॅटन (Manhattan) मधील आहे. असं सांगितलं जात आहे की, एका इमारतीत भयंकर आग लागली होती. आगीमुळे दोन तरूण एका रूममध्ये अडकून पडले होते. इमारतीला लागलेली आग इतकी जास्त होती की, त्यांना बाहेर येण्याचा रस्ताच दिसत नव्हता. अखेर दोघेही खिडकीजवळ आणि बाहेर लटकले. तुम्ही बघू शकता की, दोघेही बराच वेळ खिडकीबाहेर लटकून होते. त्यानंतर ते पाइपच्या मदतीने खाली आले. मोठ्या मुश्कीलीने त्यांनी त्यांचा जीव वाचवला.

हा व्हिडीओ पाहिल्या काही सेकंदासाठी मनात धडकी भरते. कारण ही अशी घटना होती ज्यात थोडा जरी उशीर झाला असता तर दोघांचाही जीव त्यात गेला असता. नशीब चांगलं की, दोघांचाही यात जीव वाचला. ही संपूर्ण थरारक घटना कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलंय.
 

Web Title: Viral Video : Fire broke out in building then what happened watch shocking video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.