Video: नातवानं मागितली प्रॉपर्टी तेव्हा आजीनं दिलं मजेशीर उत्तर, जे ऐकून तुम्हीही पोटधरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 11:09 AM2021-08-13T11:09:51+5:302021-08-13T11:10:29+5:30

लोकं एकमेकांना टॅग करून हा व्हिडीओ शेअर करत आहे. त्याचसोबत व्हिडीओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत.

Viral video of funny conversation between grandson and grandmother related to property | Video: नातवानं मागितली प्रॉपर्टी तेव्हा आजीनं दिलं मजेशीर उत्तर, जे ऐकून तुम्हीही पोटधरुन हसाल

Video: नातवानं मागितली प्रॉपर्टी तेव्हा आजीनं दिलं मजेशीर उत्तर, जे ऐकून तुम्हीही पोटधरुन हसाल

Next

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल. एखाद्या गोष्टीचा कधी ट्रेंड बनेल, रातोरात कुणाला स्टार बनवेल सांगता येत नाही. पती-पत्नीच्या भांडणापासून प्रँक व्हिडीओपर्यंत. दरदिवशी काही ना काही चर्चा होत राहते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर इतका गाजतोय की जो कोणी हा व्हिडीओ पाहिले त्याला पोटभरून हसायला येईल आणि त्यातून एक चांगला संदेशही लोकांपर्यंत पोहचेल.

हा व्हिडीओ आहे एका आजीचा आणि तिच्या नातूचा. हा व्हिडीओ तुम्हीही हसाल. ही आजी इतक्या प्रेमळ शब्दात नातवाला समजवते की तुम्हीही तिचे चाहते बनाल. व्हिडीओत पाहू शकता की, एक नातू व्हिडीओ कॅमेरा सुरू करून आजारी आजी जी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं दिसून येते. तिच्यासोबत मस्करी करत असतो. नातू त्याच्या आजीला म्हणतो की, माझ्या मित्राच्या आजीनं तिचं घर नातवाच्या नावावर केले आणि मी अजूनही भाड्याच्या खोलीत राहतो.

यावर त्याची आजी सांगते की, तुझी आजी तुझ्यासोबत राहते, प्रेम मोठं आहे की पैसा? लोकांना आजी-नातवाची ही प्रेमळ लढाई खूप आवडत आहे. एक चप्पल मारेन सगळं आठवेल. प्रेम मोठं की पैसा? यावर नातू म्हणतो पैसे त्यावर आजीनं प्रेमापुढे पैसा काहीच नाही असं नातवाला खडसावून सांगते. सोशल मीडियात नेटिझन्सला हा व्हिडीओ खूप आवडला आहे. लोकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ शेअर करत आहे.

लोकं एकमेकांना टॅग करून हा व्हिडीओ शेअर करत आहे. त्याचसोबत व्हिडीओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. आजीचं नातवाला प्रेमानं खडसावणं सगळ्यांना भावलं आहे. आजी-नातवाच्या या व्हिडीओ सोशल मीडियात हिट ठरला आहे. लोकांनी या बिनधास्त आजीचं मजेशीर उत्तर सगळ्यांना शेअर केले आहे. आजी-नातवाच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असला तरी त्यातून जगाला खूप चांगला संदेश मिळत आहे. प्रेम आणि पैसा यात नक्कीच प्रेमाला जास्त महत्त्व दिलं जातं. भावनिक नात्यात प्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरल्यास ते नातं तुटण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ विनोदी शैलीतून सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं माध्यम ठरत आहे.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Viral video of funny conversation between grandson and grandmother related to property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.