लॉकडाऊनमध्ये बाबांनी घराबाहेर जाऊ नये म्हणून चिमुरडी देतेय दम, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:40 PM2020-04-02T13:40:58+5:302020-04-02T14:04:40+5:30

या व्हिडीओत एक लहानशी मुलगी आपल्या बाबांना घराच्या बाहेर जाण्यापासून थांबवत आहे. 

Viral video of girl arguing with dad not go out on lockdown myb | लॉकडाऊनमध्ये बाबांनी घराबाहेर जाऊ नये म्हणून चिमुरडी देतेय दम, व्हिडीओ व्हायरल

लॉकडाऊनमध्ये बाबांनी घराबाहेर जाऊ नये म्हणून चिमुरडी देतेय दम, व्हिडीओ व्हायरल

Next

कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून अधिकाधिक लोकांना रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. 
सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा लोकं घराबाहेर पडत आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन न करता सुद्धा अनेकजण गांभीर्य न समजल्यामुळे घरात बाहेर पडत आहेत. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक लहानशी मुलगी आपल्या बाबांना घराच्या बाहेर जाण्यापासून थांबवत आहे. 

या मुलीचे वडिल घराबाहेर जात होते, त्यांना अडवण्यासाठी ही चिमुरडी दारासमोर जाऊ उभी राहिली. या चिमुरडीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुकही होत आहे. .या व्हिडीओमध्ये ही मुलगी आपल्या वडिलांना, PM काकांनी सांगितले आहे बाहेर जाऊ नका, नाही तर कोरोनाव्हायरस येईल. बाहेर जाऊ नका. यावर तिचे बाबा मला जाऊदे असे म्हणतात. त्यावर मुलगी त्यांच्यावर चिडते आणि कुठे जायचे नाही, असा दम देते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊन केल्यानंतरही तिचे बाबा नियम तोडून घराबाहेर जात होते. त्यांना चिमुरडीने घरी थांबण्याचं आवाहन केले.

Web Title: Viral video of girl arguing with dad not go out on lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.