Video: गर्लफ्रेंड म्हणाली 'अनोख्या पद्धतीने प्रपोज कर', बॉयफ्रेंडची 'पद्धत' पाहून ढसाढसा रडली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:24 IST2024-12-20T13:16:46+5:302024-12-20T13:24:21+5:30
Boy Proposes girl in different way, Video: बॉयफ्रेंडने कारचा दरवाजा उघडला तेव्हा ती पूर्णपणे घाबरलेली होती

Video: गर्लफ्रेंड म्हणाली 'अनोख्या पद्धतीने प्रपोज कर', बॉयफ्रेंडची 'पद्धत' पाहून ढसाढसा रडली...
Boy Proposes girl in different way, Video: प्रत्येक मुलीची मनापासून इच्छा असते की तिच्या प्रियकराने तिला सर्वात अनोख्या पद्धतीने प्रपोज करावे. तिला ती आठवण मनात जपून ठेवायची असते. पण सध्या एक वेगळीच घटना चर्चेत आली आहे. त्यात आपल्या प्रेयसीची अनोख्या प्रपोझलची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रियकराने तिला असे सरप्राईज दिले की ती प्रेयसी अक्षरश: ढसाढसा रडली आणि मग तिने आपल्या प्रियकराला मिठी मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, एक मोठा ट्रेलर रस्त्यात मध्येच प्रेयसीची कार अडवतो. काही लोक मास्क लावून त्यातून पटापट खाली उतरतात. ते तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. तिच्या कारच्या काचा देखील फोडतात. प्रेयसी प्रचंड घाबरलेली असते. तेवढ्यात ट्रेलरचा दरवाजा उघडतो आणि त्यातून तिचा प्रियकर बाहेर पडतो. त्याच्या हातात छानसा बुके असतो. तो तिच्या कारचा दरवाजा उघडतो आणि तिला प्रपोज करतो.
घाबरलेली प्रेयसी सुरुवातीला काही क्षणांसाठी स्तब्ध होते, मग ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागते. प्रियकर तिला सावरतो आणि मग ती प्रियकाला घट्ट मिठी मारत प्रपोझल स्वीकारते. @meme.dya इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही व्हिडीओ आतापर्यंत ५४.८ मिलियन लोकांनी पाहिली आहे. त्यावर २० हजाराहून अधिक कमेंट्स आहेत.