महिलेसोबत तलावात झालं असं काही, २ लाख लोकांनी पाहिला व्हायरल झालेला व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:12 AM2021-06-17T11:12:03+5:302021-06-17T11:12:33+5:30
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला तलावाच्या मधोमध एका बोटवर योगा करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होता जे बघून समजत नाही की, ते बघून हसावं की हैराण व्हावं. योग दिवस 2021 (International Yoga Day 2021) निमित्ताने एका महिलेने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ही महिला नदीत योगा करताना दिसत आहे. पण अशातच असं काही घडतं जे बघून सगळ्यांना हसू येत आहे.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला तलावाच्या मधोमध एका बोटवर योगा करताना दिसत आहे. ती बोटवर योगा करण्याचा प्रयत्न करते इतक्यात तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती थेट पाण्यात जाऊन पडते. (हे पण वाचा : हाय गरमी! मिठाई चारून देताना असा चढला नवरीला पारा, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलंय लग्न....)
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ Weird Vidz नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण पोटधरून हसत आहेत तर काहींना ती महिला पाण्यात पडल्याच दु:खं वाटत आहे.
या व्हिडीओवर लोक विचित्र, मजेदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी लिहिलं की, जरा विचार करा या पाण्यात मगरीसारखा एखादा जीव असला असता तर? तेच काही लोक महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत. असो महिलेचा प्रयत्न अपयशी ठरला. पण तुम्ही असं ट्राय करू नका. करायचं असेलच तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ट्राय करा नाही तर भलतंच काही व्हायचं.