दोन डोंगरांमध्ये बांधलेल्या दोरीवर चालत आहे तरूणी, व्हिडीओ बघताना हृदयात भरेल धडकी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:37 PM2024-06-25T12:37:56+5:302024-06-25T12:39:02+5:30

Viral Video : सध्या सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका दोरीवर चालताना दिसत आहे आणि खाली खोल दरी आहे.

Viral Video : Girl walking on tightrope on mountain dangerous stunt watch video | दोन डोंगरांमध्ये बांधलेल्या दोरीवर चालत आहे तरूणी, व्हिडीओ बघताना हृदयात भरेल धडकी..!

दोन डोंगरांमध्ये बांधलेल्या दोरीवर चालत आहे तरूणी, व्हिडीओ बघताना हृदयात भरेल धडकी..!

Viral Video : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना नेहमीच काहीतरी रोमांचक करायचं असतं. लोक जगापेक्षा वेगळं करण्याच्या नादात असतात. पण या गोष्टी अनेकदा खूप खतरनाक असतात आणि सामान्य लोकांना अजिबात जमणं शक्य नसतं. सध्या सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका दोरीवर चालताना दिसत आहे आणि खाली खोल दरी आहे. ती एका खोल दरीवर बांधलेल्या दोरीवर चालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच अवाक् व्हाल.

@acousticfukra नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ही तरूणी दोन डोंगरांच्या मधे बांधलेल्या दोरीवर चालताना दिसत आहे. हे काम करणं काही सोपं नाही. यासाठी मोठी हिम्मत लागते. यात सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे तिला सपोर्टसाठी दोरी किंवा काहीच दिलेलं नाहीये.

अर्थात सुरक्षेच्या दृष्टीने काहीना काही नक्कीच केलं गेलं असेल, पण ते दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता की, दोन डोंगरांच्या मधे असलेल्या दरीवर दोरी बांधली आहे आणि त्यावर तरूणी चालत आहे. या तरूणीचं नाव फेथ डिकी आहे आणि तिच्याकडे दोरीवर चालण्याचा १५ वर्षाचा अनुभव आहे. ती एक प्रो हायलायनर आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत २ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, याला स्वत:वर विश्वास ठेवणं म्हणतात. तर एका व्यक्तीने या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला की, हा व्हिडीओ फेक आहे. 

Web Title: Viral Video : Girl walking on tightrope on mountain dangerous stunt watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.