Viral Video: उष्णतेचा कहर, घोड्याला आली भुरळ; पोलिसांनी अजब युक्ती लढवून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 08:16 PM2022-08-12T20:16:59+5:302022-08-12T20:17:38+5:30
अमेरिकेत भीषण उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या उष्णतेचा फक्त माणसांवर नाही, तर प्राण्यांवरही मोठा परिणाम पडत आहे.
Viral Horse Video: अमेरिकेत भीषण उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या उष्णतेचा फक्त माणसांवर नाही, तर प्राण्यांवरही मोठा परिणाम पडतोय. दरम्यान, न्यूयॉर्क सिटीमध्ये भीषण गर्मीमुळे एक घोडा चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी घडली. घोडा अचानक बेशुद्ध पडल्यामुळे तिथे उपस्थित लोक चिंतेत पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिके रेकॉर्डब्रेक उष्णतेचा सामना करत आहे. या उष्णतेचा माणसांसोबत प्राण्यांवरही परिणाम पडताना दिसतोय. न्यूयॉर्क सिटीमध्ये एका घोडागाडीला बांधलेला घोडा अचानक भुरळ येऊन पडला. घोडा अफाट क्षमता असलेला प्राणी आहे, पण या उष्णतेसमोर तोही कोसळला. त्याची हालचालही बंद झाली होती, पण तिथे उपस्थित पोलिसांनी एका वेगळ्याच युक्तीने घोड्याचा जीव वाचवला.
BREAKING: This horse COLLAPSED while pulling a carriage in NYC, likely from heat exhaustion, and has been down for over an hour.
— PETA (@peta) August 10, 2022
Horses don’t belong in big cities where they’re put in constant danger because of cars, humans, weather, and more. pic.twitter.com/vXBVRJRjPB
मॅनहॅट्टन हॅल किचन परिसरात हा घोडा बेशुद्ध पडल्यानंतर एका व्यक्तीने 911 वर कॉल केला. यानंतर तात्काळ न्यूयॉर्क पोलिस डिपार्टमेंटमधील माउंटेड यूनिट तिथे दाखल झाले. या पथकाने प्रकरणाला गांभीर्याने घेतले आणि त्या घोड्याचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांनी बेशुद्ध झालेल्या घोड्यावर थंड पाण्याचा मारा सुरू केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, पोलिसांच्या कृतीचे कौतुक होत आहे.