रात्रीच्या अंधारात 'एलियन' दिसल्याचा दावा, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:01 PM2021-05-31T16:01:35+5:302021-05-31T16:02:10+5:30

काही लोक भूतप्रेत यावर विश्वास ठेवतात तर काही लोक याला अंधश्रद्धा मानतात. सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यात एक मनुष्यासारखा दिसणारा जीव कैद झाला आहे. 

Viral video of human alien or a ghost in Hazaribagh Jharkhand | रात्रीच्या अंधारात 'एलियन' दिसल्याचा दावा, व्हायरल झाला व्हिडीओ

रात्रीच्या अंधारात 'एलियन' दिसल्याचा दावा, व्हायरल झाला व्हिडीओ

googlenewsNext

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यांवर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं. आपण पृथ्वीबाहेरच्या बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. पण अनेकदा अशी काही दृश्य बघायला मिळतात की, त्यांवर विश्वास ठेवावा लागतो. काही लोक भूतप्रेत यावर विश्वास ठेवतात तर काही लोक याला अंधश्रद्धा मानतात. सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यात एक मनुष्यासारखा दिसणारा जीव कैद झाला आहे. 

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ इन्स्टा बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की हा व्हिडीओ झारखंडच्या हजारीबागचा आहे. या व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, मनुष्यासारखी दिसणारी एक व्यक्ती रस्त्याने अंधारात चालत जात आहे. मागून येणाऱ्या काही बाइकवाल्यांनी त्या जीवावर प्रकाश टाकला. 

लोक या जीवाला एलियन मानत आहेत. पण याचा काहीही पुरावा नाही की, तो जीव एलियन होता. काही लोकांनी लगेच त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. काही लोक याला एलियन तर काही लोक भूत म्हणत आहेत. इन्स्टा बॉलिवूडमध्ये या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले की, 'मनुष्य, एलियन की भूत? सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
 

Read in English

Web Title: Viral video of human alien or a ghost in Hazaribagh Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.