Viral Video : १२ हजार फूट उंचीवरून स्काडायवरचा आयफोन खाली पडला, बघा पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 04:14 PM2021-01-07T16:14:00+5:302021-01-07T16:17:30+5:30

इंडिया टाइम्सनुसार, या व्यक्तीचं नाव आहे Kody Madro. तो एक स्कायडायव्हर आहे. तो १२ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करत होता.

Viral video of iphone survives 12000 feet fall from skydiving | Viral Video : १२ हजार फूट उंचीवरून स्काडायवरचा आयफोन खाली पडला, बघा पुढे काय झालं?

Viral Video : १२ हजार फूट उंचीवरून स्काडायवरचा आयफोन खाली पडला, बघा पुढे काय झालं?

googlenewsNext

ज्या व्यक्तीकडे आयफोन आहे त्याचा आयफोन खाली पडला तर मनाला किती आणि कसं दु:खं होतं हे त्यालाच कळू शकेल. म्हणून तर आयफोन वापरणारे लोक आयफोनला तळहाताच्या फोडासारखे जपतात. कारण त्यांना तो पुन्हा घेणं परवडणारं नसतं. आता विचार करा एका व्यक्तीला आयफोन १२ हजार फूटावरून खाली पडला तर काय झालं असेल. एक स्कायडायव्हर आकाशातून १२ हजार फूटावरून खाली उडी घेतो आणि त्याच्या खिशातील आयफोन खाली पडतो. 

इंडिया टाइम्सनुसार, या व्यक्तीचं नाव आहे Kody Madro. तो एक स्कायडायव्हर आहे. तो १२ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करत होता. त्याचा मित्र त्याचा व्हिडीओही शूट करत होता. तेव्हाच त्याच्या खिशातून काहीतरी खाली पडलं. त्याच्या मित्राच्या हे लक्षात नाही आलं की खाली काय पडलं. तो आयफोन होता. हा आयफोन आकाशातून १२ हजार फूटाहून खाली पडला.

याचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. यात तुम्ही बघू शकता की, आयफोन हवेत उडून जातो. ही घटना आहे जानेवारी २०२०. पण हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्यांनी सांगितले की, तो कधीही डायव्हिंग दरम्यान कधीही फोन सोबत नेत नाही. नंतर Find My Phone च्या मदतीने त्याला त्याचा फोन मिळाला. पण फोन पूर्णपणे तुटला होता. पण चालू होता.  

ब्राझीलचे डॉक्टुमेंट्री सिने निर्माता अर्नेस्टो गालियोट्टो यांचा फोनही एकदा विमानातून पडला होता. त्यांचा फोन १ हजार फूट उंचीवरून खाली पडला होता. पण तरी तो फोन चांगल्या स्थितीत होता. याचा त्यांनी व्हिडीओही शेअर केला होता. 
 

Web Title: Viral video of iphone survives 12000 feet fall from skydiving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.