Video! सलाम! भर पावसात तब्बल ५ तास उभी राहिली महिला, जेणेकरून काही दुर्घटना होऊ नये...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 10:33 AM2020-08-08T10:33:40+5:302020-08-08T10:38:26+5:30
ही महिला रस्त्यावर असलेल्या मॅनहोलवर उभी राहून गाड्यांना रस्ता दाखवत आहे. जेणेकरून अपघात होऊ नये. भर पावसात महिलेच्या हिंमतीला लोकांकडून सलाम केला जातोय.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. इतकं की, पूर स्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे पाणी भरलं गेलंय. रस्ते आणि रेल्वेचे टॅकही पाण्याखाली आले आहेत. पावसाने केलेली ही स्थिती पाहून मुंबईकरांना २६ जुलैची आठवण झाली. सोशल मीडियात कितीतरी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यात एका महिलेचाही व्हिडीओ आहे. ही महिला रस्त्यावर असलेल्या मॅनहोलवर उभी राहून गाड्यांना रस्ता दाखवत आहे. जेणेकरून अपघात होऊ नये. भर पावसात महिलेच्या हिंमतीला लोकांकडून सलाम केला जातोय.
हा व्हिडीओ बुधवारी Bhayander Gudipadva Utsav फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलाय. त्यात दावा करण्यात आला आहे की, 'हा व्हिडीओ माटुंगा वेस्टच्या तुलसी पाइप रोडा आहे. या महिलेने साचलेले पाणी जावं म्हणून आधी मॅनहोल उघडलं आमि नंतर ५ तास त्याजवळ उभी राहून लोकांना रस्ता दाखवत आहे. सलाम!'. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ७.८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलाय. तीन हजारांपेक्षा जास्त रिअॅक्शन्स आणि ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडीओत बघू शकता की, भर पावसात महिला रस्त्याच्या मधोमध उघडलेल्या मॅनहोलजवळ उभी आहे. रस्त्यावर भरपूर पाणी साचलंय. ही महिला सतत रस्त्याने येणाऱ्या गाड्यांना बाजूने जाण्यास सांगत आहे. ती त्यांना मॅनहोलजवळ येऊ नका अशा इशारा करत आहे. महिलेने रस्त्यावर साचलेलं पाणी निघून जावं म्हणून मॅनहोलं झाकण उघडलं. तसेच काही दुर्घटना होऊ नये म्हणून ती तब्बल ५ तास तिथेच उभी राहून लोकांना रस्ता दाखवत होती. भर पावसात महिलेने केलेल्या कामाला सलाम!
हे पण बघा :
Viral Video : नादखुळा... पाण्यातून वाट काढताना लोकांची हालत; 'ते' दोघं गेले स्टाईलमध्ये तरंगत!
Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण
कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक!