धक्कादायक व्हिडीओ : 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे गेली वाहून, वाचला केवळ एक कुत्रा....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 12:35 PM2020-06-06T12:35:10+5:302020-06-06T12:39:00+5:30
लॅंडस्लाइडमध्ये 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे वाहून गेल्याचे दिसत आहे. एबीसी न्यूजने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर याचा व्हिडीओ शेअर केलाय.
काही दिवसांपूर्वीच आलेल्या निसर्ग वादळाने कोकणातील कित्येक गावांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. लॅंडस्लाइडचा मोठा धोका यावेळी होता. पण तसं सुदैवाने तसं झालं नाही. पण नॉर्वेतील एक लॅंडस्लाइडचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
यात समुद्रकिनारी झालेल्या लॅंडस्लाइडमध्ये 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे वाहून गेल्याचे दिसत आहे. एबीसी न्यूजने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर याचा व्हिडीओ शेअर केलाय. ही घटना नॉर्वेच्या एल्टा शहरात घडली. या 8 घरे आर्कटिक महासागरात सामावली. Jan Egil नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
SWEPT AWAY: Powerful landslide sweeps eight houses into the sea in the Norwegian Arctic.
— ABC News (@ABC) June 5, 2020
No injuries were reported, and a dog that was washed into the ocean was able to swim back to land safely. https://t.co/Ud9tEeci8dpic.twitter.com/Cri06yUzDv
या घटनेत एक कुत्राही वाहून गेला होता. सुदैवाने काही वेळाने तो पोहत परत आला होता. यात अनेक लोकांचं नुकसान झालं. सुदैवाने यात कोणत्याही व्यक्तीला काहीही झालं नाही. पण यात लॅंडस्लाइडचं रौद्ररूप बघायला मिळतं. विचार करा प्रत्यक्षात हे कसं दिसत असेल.