Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या गाडीचा पाठलाग करू लागला सिंह अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:24 PM2019-10-12T17:24:05+5:302019-10-12T17:24:40+5:30
तुम्ही एखाद्या ठिकाणी जंगल सफारी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आधी हा व्हिडीओ नीट पाहा. कारण काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, पण तिथे त्यांच्यासोबत जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही एखाद्या ठिकाणी जंगल सफारी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आधी हा व्हिडीओ नीट पाहा. कारण काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, पण तिथे त्यांच्यासोबत जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. काही लोक जंगल सफारीसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे असलेल्या 'अटल बिहारी वाजपेयी झुओलॉजिकल पार्कमध्ये फिरण्यासाठी गेले होते. जिथे एक सिंह त्यांच्या गाडीचा पाठलाग करू लागला.
पाहा व्हिडीओ...
व्हायरल होणारा हा व्हिडीओ गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने शूट केला आहे. दरम्यान, अद्याप हे समजू शकलेलं नाही की, त्या सिंहाने गाडीचा पाठलाग का केला?
काय आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये सिंह गाडीचा पाठलाग करताना दिसत आहे. एक वेळ अशी येते की, तो गाडीपर्यंत पोहोचणारच इतक्यात ड्रायवर गाडी सुरू करून पळ काढतो. काही वेळानंतर पर्यटकांना असं वाटतं की, त्यांनी कदाचित सिंहाला मागे टाकलं असेल. पण गाडी थांबवल्यानंतर काही सेकंदातच सिंह मागून येताना दिसतो. अशातच पुन्हा ड्रायवर गाडी सुरू करून तिथून पळ काढतो.
याआधीही अशी घटना घडली होती...
काही महिन्यांआधीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक सिंह दोन दुचाकीस्वारांचा पाठलाग करतो. पण यातून दुचाकीस्वार सुखरूप बचावतात. ही घटना केरळमध्ये झाली होती.