VIDEO : शिकार करण्यासाठी आला होता सिंह, पण म्हशीने शिंगांनी मारून मारून केलं रक्तबंबाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 12:20 PM2021-12-18T12:20:10+5:302021-12-18T12:21:15+5:30

Viral Video : आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात एक म्हशीने जंगलाचा राजा सिंहाची हालत खराब केली.

Viral Video : The lion had come to hunt but the buffalo get him bled to death watch video | VIDEO : शिकार करण्यासाठी आला होता सिंह, पण म्हशीने शिंगांनी मारून मारून केलं रक्तबंबाळ

VIDEO : शिकार करण्यासाठी आला होता सिंह, पण म्हशीने शिंगांनी मारून मारून केलं रक्तबंबाळ

googlenewsNext

Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे भांडणाचे कितीतरी व्हिडीओ बघायला मिळतात. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं कारण त्याच्यासमोर प्रत्येक प्राण्याची हालत खराब होते. पण आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात एक म्हशीने जंगलाचा राजा सिंहाची हालत खराब केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, एका  म्हशीने सिंहाला मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं होतं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका सिंह जंगली म्हशीची शिकार करण्यासाठी येतो. पण म्हैस त्या सिंहावर तुटून पडते. सिंहाला सळो की पळो करून सोडते. म्हैस आपल्या शिंगानी सिंहाला उचलून  उचलून आपटते.

म्हशीचा हल्ला इतका जोरदार आहे की, सिंह काहीच करू शकत नाही किंवा त्याला तशी काही संधीही मिळत नाहीये.
तुम्ही बघू शकता की, म्हशीने उचलून आपटल्यावरही सिंह काही तिचा पिच्छा सोडत नाही आणि अनेकदा तिच्यावर हल्ला करतो. मात्र, म्हैस फारच खतरनाक मूडमध्ये आहे. जितक्यांदा सिंह तिच्यावर हल्ला करतो, म्हैस तेवढ्यांदा शिंगानी उचलून आपटते. 

व्हिडीओच्या शेवटी दिसतं की, सिंह पूर्णपणे जखमी झाला आहे. त्याच्या शरीरातून रक्त येत आहे. यानंतर तर असं वाटतं की, जंगलाचा राजा सिंहाने हार मानली. पण तरी तो म्हशीला पंजाने पकडण्याचा प्रयत्न करतो. पण बरंच रक्त वाहून गेल्याने त्याची पकड कमजोर झाली आहे. हा व्हिडीओ लोकांना अवाक् करणारा आहे. 
 

Web Title: Viral Video : The lion had come to hunt but the buffalo get him bled to death watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.