भारीच! चिमुकल्याने एका दमात शिव तांडव स्त्रोत म्हटले, लोक म्हणाले, 'हर हर महादेव'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:44 AM2023-07-16T11:44:41+5:302023-07-16T11:45:16+5:30

या व्हिडीओत एक गोंडस चिमुकला शिव तांडव एका दमात म्हणत असल्याचे दिसत आहे. 

viral video little kid shiv tandav stotra | भारीच! चिमुकल्याने एका दमात शिव तांडव स्त्रोत म्हटले, लोक म्हणाले, 'हर हर महादेव'

भारीच! चिमुकल्याने एका दमात शिव तांडव स्त्रोत म्हटले, लोक म्हणाले, 'हर हर महादेव'

googlenewsNext

श्रावण महिना काही दिवसातच सुरू होईल. श्रावण महिन्याला खूप महत्व असते. देशात श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात अनेक भक्त शिव तांडव स्त्रात म्हणतात. शिव तांडव भगवान शंकर यांना प्रिय आहे, सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक गोंडस चिमुकला शिव तांडव एका दमात म्हणत असल्याचे दिसत आहे. 

शाब्बास पोरा! दिवसा काम, रात्री अभ्यास; हॉटेलचा वेटर झाला तहसीलदार, अशी आहे सक्सेस स्टोरी

सध्याच्या काळात मुलांना मोबाईलच मोठ वेढ आहे. त्यामुळे मुलांना भक्ती देवांशी संबंधीत आवड नसल्याचे दिसत आहे. पण,या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. हा चिमुकला अपवाद आहे. त्याने एका दमात शिव तांडव म्हटले आहे.    

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चिमुकला शिव तांडव स्तोत्र गात असल्याचे दिसत आहे, जे आठवून किंवा नुसते बोलून लोकांना घाम फुटतो. मुलाचा आत्मविश्वास आणि गाण्याची पद्धत खरोखरच पाहण्यासारखी आहे. भगवान शंकर यांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. अशा वेळी शिव तांडव स्तोत्र ऐकायला मिळाले तर ते ऐकल्याने अंगात एक वेगळीच ऊर्जा भरते. पण हे लहान मूल ज्या प्रकारे भजन गात आहे ते खरोखरच आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला पहिली व्यक्ती मुलाला शिव तांडव स्तोत्र म्हणायला सांगते, मग तो चिमुकला, काका मी म्हणतो, ती व्यक्ती म्हणते की सर्व शिवभक्त आनंदी होतील. यानंतर तो चिमुकला एका दमात शिव तांडव म्हणतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक कमेंटमध्ये 'हर हर महादेव' लिहित आहेत.

Web Title: viral video little kid shiv tandav stotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.