Video: पाकिस्तानी अॅंकरने विचारले किती केस शिल्लक राहिले? प्रेक्षकाने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल लोटपोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 01:34 PM2019-04-27T13:34:01+5:302019-04-27T13:38:16+5:30
पाकिस्तानातील एका लाइव्ह टीव्ही शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सना हसू आवरता येणं कठिण झालं आहे.
पाकिस्तानातील एका लाइव्ह टीव्ही शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सना हसू आवरता येणं कठिण झालं आहे. पाकिस्तानी हम न्यूज चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या सकाळच्या शोमध्ये 'केसगळती' समस्येवर चर्चा सुरु होती. अॅंकर आणि एक्सपर्टमध्ये चर्चा सुरु होती. अशातच एका कॉलरचा फोन आला आणि तो बोलताना एका वाक्य असं काही बोलून जातो की, स्क्रीनवरील लोकांनाही हसू आवरत नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये कॉलर अॅंकरला त्याची केसगळतीची समस्या सांगत असतो की, कसे त्याचे २३व्य वर्षी केस गेले. नंतर समोर आलं की, या कॉलरचं नाव हुमायूं असं आहे. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हुमांयू त्याची समस्या सांगत होता इतक्यात अॅंकर ओवेइस मंगलावालाने कॉलरला प्रश्न केला की, 'तर आता किती शिल्लक राहिले डोक्यावर?. यावर कॉलरने क्षणाचाही वेळ न घालवता सांगितले की, 'आता सर जी तुमची कंडिशन आहे, तिच माझी आहे'. कॉलरच्या या उत्तरावर लाइव्ह शोमध्ये एकच हशा पिकला.
If you are having a bad day... pic.twitter.com/zslNHFtFpY
— Azhar (@MashwaniAzhar) April 24, 2019
तर या कॉलरच्या या उत्तरावर अॅंकर ओवोइस मंगलावालाने दमदार वापसी केली आणि म्हणाला, 'एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, इतर लोकांच्या तुलनेत ज्यांना कमी केस असतात ते अधिक सुंदर असतात'.
A big thank you to the person who made this :) pic.twitter.com/QZX6zS5NFY
— Ovais Mangalwala (@ovaismangalwala) April 24, 2019
या सर्व गमतीदार गोष्टींची लोक सोशल मीडियातून मजा घेत आहेत. तर अॅंकरचं कौतुकही केलं आहे. कारण त्याने स्थिती चांगल्याप्रकारे सांभाळून घेतली.