लेक गयावया करत असताना बापाची बेदम मारहाण; कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:06 PM2021-11-30T12:06:52+5:302021-11-30T12:15:47+5:30

बेदम मारहाणीचा व्हिडीओ पाहून अनेकांकडून संताप व्यक्त; कारवाईची मागणी

viral video of man brutally thrashing son in hyderabad | लेक गयावया करत असताना बापाची बेदम मारहाण; कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

लेक गयावया करत असताना बापाची बेदम मारहाण; कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

googlenewsNext

एक बाप आपल्या लेकाला जबर मारहाण करत असतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक बाप रागाच्या भरात ७ ते ८ वर्षांच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुलगा गयावया, विनंती करूनही वडील मारायचे थांबत नाहीत. मुलाच्या आक्रोशानंतरही वडिलांच्या काळजाला पाझर फुटत नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घटना हैदराबादची असल्याचं सांगण्यात येत आहे. वडील मुलाला एका दांड्यानं अमानुषपणे मारहाण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पप्पा जाऊ द्या ना पप्पा, असं म्हणत मुलगा विनवणी करत आहे. या मारहाणीचं व्हिडीओ चित्रित करणारी त्याची बहिणदेखील वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र वडील तरीही मारहाण करतच आहेत. वडिलांनी केलेल्या मारहाणीमुळे मुलाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. 

दारुच्या नशेत वडिलांनी मुलाला बेदम मारलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारा इसम एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचं नाव अशोक आहे. नातेवाईकांच्या घरी मस्ती केल्यानं अशोकनं मुलाला मारहाण केली, असं द हिंदूनं वृत्तात म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुलगा शनिवारी त्याच्या मावशीकडे गेला होता. मुलगा मस्ती करत असल्यानं मावशीनं अशोकला फोन करून त्याला परत नेण्यास सांगितलं. त्यानंतर अशोक मुलाला घरी घेऊन आला. नशेच्या अमलाखाली असलेल्या अशोकनं मुलाला बेदम मारहाण केली. त्याआधी त्यानं स्वत:चा मोबाईल मुलीकडे दिला आणि तिला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: viral video of man brutally thrashing son in hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.