टाळी वाजवल्यानंतर फुलणाऱ्या फुलाचा व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या खरंच असं होतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:54 PM2024-09-27T15:54:08+5:302024-09-27T16:29:37+5:30
Viral Video : एका फुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण खरंच होऊ शकतं का की हा व्हिडीओ फेक आहे? ते जाणून घेऊ.
Viral Video : जगभरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि फुलं आहेत. ही तर वेगवेगळ्या रंगाची आणि प्रजातीची आहेत. ही सुंदर आणि रंगीबेरंगी फुलं बघून कुणाच्याही चेहऱ्यावर हसू फुलतं किंवा चेहरा फ्रेश होतो. तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहिली असतील. पण तुम्ही कधी टाळी वाजवल्यानंतर फुलणारं फूल पाहिलं का? क्वचितच असं फूल कुणी बघितलं असेल. सध्या अशाच एका फुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण खरंच होऊ शकतं का की हा व्हिडीओ फेक आहे? ते जाणून घेऊ.
इन्स्टाग्राम अकाउंट @amazingtaishun वर काही दिवसांआधी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यात एक झाड दिसत आहे आणि त्यावर काही पिवळी सुंदर फुलेही दिसत आहेत. या झाडासमोर काही लोक उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. टाळ्यांच्या आवाजाने फूल उमलताना दिसत आहे. व्हिडिओत सांगण्यात आलं की, कळीसमोर कुणी टाळ्या वाजवल्या तर फूल उमलतं. पण खरंच असं होतं का?
मुळात टाळी वाजवल्यामुळे फूल उमलतं असं काही होत नाही. या फुलाचं नाव कॉमन इव्हिनिंग प्राइमरोज आहे. रिपोर्ट्सनुसार, हे फूल सायंकाळी उमलतं. व्हिडिओतील व्यक्तीला हे फूल उमलण्याच्या वेळेचा अंदाज माहीत असेल, त्यावेळीच त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला.
या व्हिडिओला आतापर्यंत ५८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, मनुष्यांनाही असंच ट्रिट केलं जावं. दुसऱ्याने लिहिलं की, जेव्हा तुमची प्रशंसा होते तेव्हा तुम्हीही आनंदी होता.