बापरे! नारळाच्या झाडावर चढलेल्या माणसाची करामत पाहून उडेल थरकाप; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 12:49 PM2020-09-28T12:49:59+5:302020-09-28T12:51:47+5:30
आतापर्यंत कोणीही इतक्या उंचावरून झाड कापताना पाहिलं नसेल.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक माणूस उंचच उंच नारळाच्या झाडावर चढलेला तुम्हाला दिसून येईल. हा व्हिडीओ पाहून लाखों लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. झाड कापण्याची अशी पद्धत तुम्ही या आधी कधीही पाहिली नसेल. मुळापासून झाड कापण्याऐवजी झाडावर चढून झाड कापताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.
Ever seen anyone cut a really tall palm tree?
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) September 25, 2020
Oh my god... pic.twitter.com/O0sde0ZCz0
अमेरिकेतील बास्केटबॉलपटू रेक्स चॅपमॅन यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडाच्या उंचावर एक माणूस बसला आहे. झाडाचा वरचा भाग कापल्यानंतर झाड पूर्णपणे वाकायला सुरूवात होते. अश्यात झाड कापणारा माणूस वर लटकलेला राहतो. झाडाची पानं खाली पडतात. पण तो माणूस मात्र तिथेच चिकटून राहतो. अनेकदा हा माणूस खाली पडेल की काय? अशी भीती प्रेक्षकांना वाटते.
आतापर्यंत कोणीही इतक्या उंचावरून झाड कापताना पाहिलं नसेल. ओह माय गॉड असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. रेक्स यांनी २५ सप्टेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून २५ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.
हे पण वाचा-
Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस
अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'