सफरचंद रंग लावून केले जातात लाल? हा व्हिडीओ पाहून उडेल तुमची झोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:24 PM2024-07-06T15:24:19+5:302024-07-06T15:29:03+5:30
Viral Video : तुम्हाला विश्वास बसणार नाही की, सफरचंद नसले तरी लाल दाखवण्यासाठी काय केलं जातं.
सफरचंद आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्हाला माहीत आहेच. कुणी आजारी असलं तर त्यांना सफरचंदच दिले जातात. पण आजकाल भेसळयुक्त गोष्टी इतक्या मिळतात की, सफरचंदही यापासून सुटलेले नाहीत. भेसळीचा एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुम्हाला विश्वास बसणार नाही की, सफरचंद नसले तरी लाल दाखवण्यासाठी काय केलं जातं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका भांड्यामध्ये लाल रंग आहे. एक व्यक्ती हातांमध्ये ब्रश घेऊन लाल नसलेल्या सफरचंदाला लाल रंग देत आहे. त्यानंतर सफरचंद लाल आणि फ्रेश दिसतो. अशाप्रकारे आजकाल फसवणूक केली जात आहे. असं असलं तरी हा व्हिडीओ खरंच ओरिजनल सफरचंदचा आहे, याचा दावा आम्ही करत नाही.
तैयार हो रही हैं एकदम लाल लाल एपल
— Arvind Chotia (@arvindchotia) July 3, 2024
रोज एक एपल खाओ, डॉक्टर के पास जाओpic.twitter.com/Ard4kZ66Ab
अर्थात हे सफरचंद खाऊन कुणाचंही आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशाप्रकारच्या रंगांमुळे फूड पॉयजनिंग किंवा इतरही काही समस्या होऊ शकतात. हा व्हिडीओ पाहून कुणीही बुचकळ्यात पडेल की, ओरिजनल काय आहे आणि फेक काय आहे.
X च्या @arvindchotia वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'तयार होत आहेत एकदम लाल-लाल सफरचंग...रोज एक अॅपल खा आणि डॉक्टरांकडे जा'.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. तसेच ते या व्हिडीओ वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत.
एका यूजरने लिहिलं की, "ही कलर वॅक्स कोटिंग आहे. धुतल्यावरही निघणार नाही. याला सोलूनच खावं लागेल". दुसऱ्या यूजरने लिहिलं की, "एकतर आधीच महागाई त्यात पैसे देऊन विष खरेदी करत आहोत आपण. कसं वाचणार या भेसळीपासून? सरकार काही करत का नाही, अशा लोकांना मृत्यूदंड दिला पाहिजे". बऱ्याच लोकांनी दावा केला आहे की, हा चीनमधील जुना व्हिडीओ आहे आणि हे खरे नाही तर नकली अॅपल कॅंडी आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.