Viral Video : प्लॅटफॉर्मवरून खाली पडताच समोरून आली ट्रेन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:18 PM2019-11-06T13:18:57+5:302019-11-06T13:19:17+5:30
एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहताना दिसत आहे.
यूएसमधील कॅलिफोर्नियातील कोलिजियम स्टेशनमध्ये एक मोठी घटना घडली. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहताना दिसत आहे. स्टेशनवर ट्रेन येते. तेवढ्यात व्यक्ती प्लॅटफॉर्मवरनू ट्रेनच्या रूळावर पडतो आणि मदतीसाठी ओरडतो. तेवढ्यात एका एरिया रॅपिड ट्रांजिट (BART) कर्मचाऱ्याने आपल्या जिवावर खेळून व्यक्तीचा जीव वाचवला. ही घटना रविवारी घडली असून लोक ऑकलॅन्ड रायडर गेम पाहून आपापल्या घरी जात होते. स्टेशनवरील सीसीटिव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
पाहा सदर घटनेचा व्हिडीओ :
स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव जॉन ओ'कॉनर आहे आणि तो संध्याकाळी स्टेशनवरील गर्दी नियंत्रिणात ठेवण्यासाठी स्टेशनवर काम करत होता. कर्मचारी प्लॅटफॉर्मवरून खाली पडलेल्या व्यक्तीच्या जवळ उभा होता. जशी ती व्यक्ती खाली पडली, कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवून त्या व्यक्तीला लगेच मदतीचा हात पुढे केला आणि त्याचा जीव वाचवला.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ सॅन फ्रान्सिस्को बे एरिया ट्रान्जिटने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 'आमचा हिरो जॉन ओ'कॉनरने रविवारी रात्री कोलिजियम स्टेशनवर एका व्यक्तीचा जीव वाचवला. जॉन एक परिवहन पर्यवेक्षक आहे आणि त्यांनी 20 पेक्षा जास्त वर्षांसाठी BART मध्ये काम केलं आहे. त्यांनी प्रसंगावधाना राखून त्या व्यक्तीचा जीव वाचवला.'
This #BART worker just saved this man from falling onto the tracks as the train was approaching! Amazing!! pic.twitter.com/RX3zD36853
— Tony Badilla (@TonyBadilla) November 4, 2019
घटना घडत असताना टोनी बदीला नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्या प्रवाशाचा जीव कर्मचाऱ्याने वाचवला होता. तो कर्मचाऱ्याचे आभार मानत होता.
BARTने सीएनएनशी बोलताना सांगितले की, जेव्हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर पडली त्यावेळी नशेत होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोक कर्मचाऱ्याचं कौतुक करत आहेत. एका यूजरने असं लिहिलं आहे की, 'हा खरा सुपरहिरो आहे. प्रत्येकामध्ये अशीच माणुसकी असणं गरजेचं आहे.'