छोंडेगे ना हम तेरा साथ....ऑक्सीजन अन् व्हेंटिलेटर लावलं असूनही बेडवर तंबाखू मळत होता रूग्ण....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 01:09 PM2021-04-24T13:09:23+5:302021-04-24T13:14:51+5:30

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात व्हिडीओत एक व्यक्ती व्हेंटिलेटर लावून बेडवर झोपला आहे. अशातही तो तंबाखू मळताना दिसत आहे.

Viral video of man making tobacco on ventilator and oxygen | छोंडेगे ना हम तेरा साथ....ऑक्सीजन अन् व्हेंटिलेटर लावलं असूनही बेडवर तंबाखू मळत होता रूग्ण....

छोंडेगे ना हम तेरा साथ....ऑक्सीजन अन् व्हेंटिलेटर लावलं असूनही बेडवर तंबाखू मळत होता रूग्ण....

googlenewsNext

सध्या देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. लोकांना ऑक्सीजन आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीयेत. ज्यांना यातील एकही गोष्ट मिळाली तर ते स्वत:ला नशीबवान मानतात. कोरोनाने आजारी असताना आणि इतकं टेंशन असतानाही काही लोक त्यांच्या सवयी सोडू शकत नाही. असंच चित्र दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात व्हिडीओत एक व्यक्ती व्हेंटिलेटर लावून बेडवर झोपला आहे. अशातही तो तंबाखू मळताना दिसत आहे.

सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला ज्यावर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ पाहून काही लोक हसत आहेत तर काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या व्हिडीओत एक रूग्ण व्हेंटिलेटरवर नाजूक स्थितीत झोपलेला आहे. त्याच्या तोंडात ऑक्सीजन पाइप लावलेला आहे. पण तो त्याचे हात अशा अंदाजात घासत आहे की, तो तंबाखू मळतो आहे.

व्हि़डीओत स्पष्टपणे बघितलं जाऊ शकतं की, रूग्णाजवळ एक महिला उभी आहे. तरी हा रूग्ण त्याचं काम करण्यात मग्न आहे. रूग्णाचं हे कृत्य लगेच रेकॉर्ड करण्यात आलं होतं. आयपीएस ऑफिसर रूपिन शर्माने व्हायरल व्हिडीओ शेअर करून लिहिले की, दुसरा महत्वाचा आयटम, छोडेंगे न तेरा साथ....मरते दम तक..दारू अजूनही लिस्टमध्ये टॉपवर आहे...'.

३० सेकंदाचा हा व्हिडीओ ट्विटरवर आतापर्यंत ९४९ लोकांनी पाहिला. आणि २१ लोकांनी यावर रिअॅक्शन दिली आहे. जास्तीत जास्त कमेंटमध्ये लोकांनी लिहिले की, ही न सुटणारी सवय असं लिहिलंय.  
 

Web Title: Viral video of man making tobacco on ventilator and oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.