Phone fire : पत्नीसह रस्त्यावर चालत होता; काही कळायच्या आतच मोबाईलला लागली आग, अन् मग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 01:51 PM2021-04-21T13:51:34+5:302021-04-21T13:55:25+5:30

Mobile phone catching fire : या आगीमुळे या माणसाचे केस, भुवया आणि  हात पूर्णपणे जळाले. आसपास असलेल्या वाहनांनासुद्धा आग लागण्याची शक्यता होती.

Viral video of man mobile phone catching fire when he was walking with his wife | Phone fire : पत्नीसह रस्त्यावर चालत होता; काही कळायच्या आतच मोबाईलला लागली आग, अन् मग

Phone fire : पत्नीसह रस्त्यावर चालत होता; काही कळायच्या आतच मोबाईलला लागली आग, अन् मग

Next

आजच्या काळात मोबाईल फोन लोकांना जीवापेक्षा जास्त प्रिय असतो. लोक एकवेळेस स्वतःला विसरतील पण आपल्या मोबाईल फोनला कधीच विसरणार नाहीत. पण हाच मोबाईल फोन अनेकदा मृत्यूचं कारण ठरू शकतो. मोबाईल फोनमुळे दुर्घटना होणं काही नवीन नाही. सध्या सोशल मीडियावर मोबाईलमुळे झालेल्या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता एका माणसानं आपला फोन बॅगमध्ये ठेवलेला असतो. अचानक त्याच्या फोनला आग लागते. आग इतकी वेगानं लागते की फोन बॅगेतून बाहेर काढण्याआधीच  पेट घेतलेला असतो. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आपल्या पत्नीसह रस्त्यावरून जात असतो. त्याचवेळी बॅगला अचानक आग लागते. आग लागल्याचं जाणवताच हा माणूस वेगानं फोन बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतो. धक्कादायक! फक्त एका फेक कॉलने चोरांनी महिलेचे लुटले २४० कोटी रूपये, समजलं तेव्हा उशीर झाला होता.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही या आगीमुळे या माणसाचे केस, भुवया आणि  हात पूर्णपणे जळाले. आसपास असलेल्या वाहनांनासुद्धा आग लागण्याची शक्यता होती. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा त्या व्यक्तीचा फोन चार्ज नव्हता. तसंच त्यानं फोन चार्जलाही लावला नव्हता. पीडित तरूणानं  दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून  फोनची बॅटरी खराब झाल्याची समस्या जाणवत होती. बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग...

Web Title: Viral video of man mobile phone catching fire when he was walking with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.