Viral Video: वडिलांच्या अंत्यविधीवेळी महिलेला केले प्रपोज, व्हिडिओ व्हायरल होताच लोक भडकले !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:48 PM2022-05-17T12:48:16+5:302022-05-17T12:49:09+5:30
Viral Video: महिला तिच्या वडिलांच्या शवपेटीजवळ बसून रडत होती, तेव्हा एका व्यक्तीने अचानक तिला प्रपोज केले.
Viral Propose Video: आयुष्यातील एखादा क्षण कायम आठवणीत राहावा, यासाठी लोक विविध गोष्टी करतात. मुलीला लग्नासाठी प्रपोज करताना तरुण अतिशय चांगले ठिकाणी आणि योग्य वेळीची प्रतिक्षा करतात. पण, दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीने चक्क कब्रस्थानमध्ये महिलेला प्रपोज केलं. विशेष म्हणजे, त्या महिलेच्या वडिलांचा अंत्यविधी होत असताना हा सगळा प्रकार घडला.
महिलेच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रपोज केल्याची घटना दक्षण आफ्रिकेत घडली आहे. व्यक्तीने महिलेला प्रपोज केले, त्यावेळेस महिला वडिलांच्या शवपेटीजवळ बसून रडत होती. विशेष म्हणजे, महिलेला प्रपोज करणारा व्यक्ती तिचा बॉय फ्रेंड असून, तो एक पादरीदेखील आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
उपस्थित सर्वजण चकीत होतात
हा व्हिडिओ एका आठवड्यापूर्वी टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. या क्लिपमध्ये ती महिला आपल्या मृत वडिलांच्या शवपेटीजवळ बसून अश्रू ढाळताना दिसत आहे. यावेळी पादरी तिथे येतो आणि महिलेसमोर गुडघे टेकून तिच्या हातात अंगठी घालतो. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित होतात.