एकाचवेळी १५ जणांनी शिव तांडव स्तोत्र वाजवलं; जुगलबंदी पाहून नेटीझन्स म्हणाले, वाह, जिंकलं...
By Manali.bagul | Published: December 18, 2020 05:40 PM2020-12-18T17:40:37+5:302020-12-18T17:44:09+5:30
Trending Viral Video in Marathi : शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘शिव तांडव स्तोत्रम सुरू आहे. यासह तबलावादक जुगलबंदी करताना दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर एक शिव तांडव स्तोत्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एकदा पाहिल्या नंतर पुन्हा पुन्हा ऐकण्याची आणि पाहण्यची इच्छा होते. अर्थात याला कारणंही तसंच आहे. ‘शिव तांडव स्तोत्रम'चे असे नवीन वर्जन तुम्ही याआधी कधीही पाहिल नसेल. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘शिव तांडव स्तोत्रम सुरू आहे. यासह तबलावादक जुगलबंदी करताना दिसून येत आहेत.
Goosebumps! 🔥 pic.twitter.com/6JhTObLPIr
— Nila Madhab PANDA ନୀଳମାଧବ ପଣ୍ଡା (@nilamadhabpanda) December 18, 2020
ही जुगलबंदी पाहून अनेकजण प्रभावीत झाले आहेत. कमेंट्सचा वर्षाव या व्हिडीओवर तुम्हाला पाहता येईल. भार्गन जानी या नावाच्या सोशल मीडिया युजरने हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. २६ जुलै २०२० ला हा व्हिडीओ टाकण्यात आला होता. परंतु आता ट्विटवर पुन्हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. Nila Madhab PANDA या युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून २२ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. भारीच! जोडप्यानं अनोख्या पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस; व्हिडीओ पाहून म्हणाल, क्या बात है...
२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. युट्यूब व्हिडीओच्या डिस्क्रिपशनुसार हा व्हिडीओ गुजरातमधील राजकोटमधील तबला गुरूजीं भार्गव जानी यांनी आपल्या शिष्यांसह मिळून तयार केला आहे. त्यांना कमर्शियल तबला वादन पद्धती शिकवली जात आहे. शाब्बास पोरी! लॉकडाऊनमध्ये जेवण शिकली अन् ५८ मिनिटात ४६ पदार्थ बनवून केला विश्वविक्रम