लय भारी! दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अमेरिकन गायिकेनं गायले 'ओम जय जगदीश हरे'; पाहा व्हिडीओ
By manali.bagul | Published: November 12, 2020 05:02 PM2020-11-12T17:02:52+5:302020-11-12T17:45:34+5:30
Viral News in Marathi : दिवाळीच्या निमित्ताने मॅरीने 'ओम जय जगदीश हरे' हे हिंदी गीत आपल्या आवाजात सादर केलं आहे.
लोकप्रिय अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मॅरि मिल्बेन हिने यावर्षी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एका गाण्याचे सादरीकरण केलं आहे. या हिंदी गीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने मॅरीने 'ओम जय जगदीश हरे' हे हिंदी गीत आपल्या आवाजात सादर केलं आहे. ११ नोव्हेंबरला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता.
मॅरीच्या आवाजातील 'ओम जय जगदीश हरे' या गाण्याचं संगीत कॅनडाचे स्क्रीन अवॉर्ड, ग्रॅमी पुरस्काराने गौरवलेले ड्वरिल बेनेट यांचे आहे. सोनी पिक्चर्स चे निर्माता टिम डेविस, पुरस्कार विजेता इंजीनियर, मिक्सर जॉर्ज विवो, कार्यकारी दिग्दर्शक जॉन स्काउसे आणि अॅरिझोना मधील प्रोडक्शन कंपनी ‘एंबिएंट स्काईज़' च्या ब्रेंट मैसी व ‘ब्राइडलबीडेना' चे मालक डेना माली सोबत एकत्र येऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शुटिंग करण्यासाठी मॅरीने पारंपारिक भारतीय पोशाख सुद्धा केला आहे. नारंगी, गुलाबी घागरा चोळीवर आकर्षक साजेश्या दागिन्यांचा साज चढवला आहे.
Diwali 2020 : ना पार्लरची झंझट ना पैश्यांची कटकट; दिवाळीसाठी घरच्याघरी 'असं' करा क्लिनअप, फेशियल
मॅरीने ७४ व्या स्वातंत्र्यदिनी, १५ऑगस्ट २०२० ला भारताचं राष्ट्रगीत देखील गायले होते. या गाण्याच्या माध्यमातूनही तिने भारत प्रेम व्यक्त केले होते. भारतीय नागरिक तसेच भारतीय-अमेरिकन समुदाय माझ्यासाठी खास आहे. अशाप्रकारे दिवाळी साजरी करणं माझ्यासाठी वरदानापेक्षा कमी नसल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहे.
देव तारी त्याला कोण मारी! मातीत पुरलेलं नवजात बाळ, अनोळखी माणसांनी काढलं बाहेर अन्...