Viral Video : देसी जुगाड करून पाण्यात पळवल्या बाइक, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 10:48 AM2020-08-13T10:48:44+5:302020-08-13T10:49:26+5:30

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन तरूण पाण्यात बाईक चालवत आहेत. बाइकसाठी पेट्रोल एका बॉटलमध्ये वरच्या बाजूने ठेवलं आहे. आणि बाइकचं सायलेन्सरही वरच्या बाजूने ठेवलं आहे.

Viral Video : Motorcycle ‘Jugaad’ For Waterlogged Roads Impresses Twitter | Viral Video : देसी जुगाड करून पाण्यात पळवल्या बाइक, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक...

Viral Video : देसी जुगाड करून पाण्यात पळवल्या बाइक, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक...

Next

सोशल मीडियात एक देसी जुगाड असलेला व्हिडीओ फारच व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीने एक अशी बाइक तयार केलीये जी पाण्यातही धावते. हा अनोखा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा  व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी शेअर केलाय. याला त्यांनी कॅप्शन दिलंय, 'असं कधी पाहिलं नाही, शानदार जुगाड'.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन तरूण पाण्यात बाईक चालवत आहेत. बाइकसाठी पेट्रोल एका बॉटलमध्ये वरच्या बाजूने ठेवलं आहे. आणि बाइकचं सायलेन्सरही वरच्या बाजूने ठेवलं आहे. जेणेकरून त्यात पाणी जाऊ नये. अवनीष शरण यांनी हा व्हिडीओ ११ ऑगस्टला शेअर केला होता. ज्याला आता हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तेवढेच लाइक्स आणि रिट्विटही मिळाले आहेत. लोकांना हा देसी जुगाड फारच आवडला असून लोक व्हिडीओ शेअर करत आहेत.

हा व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात आहे. जिथे पूर आलाय. पण पाण्यात चालवल्या जाणाऱ्या बाइकचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जातोय. लोकांनी कमेंटही केल्या आहेत की, भारतीय जुगाड करण्यात नेहमी पुढे आहेत. 

या लोकांनी देसी जुगाड करून पाण्यात बाइक पळवली खरी, पण असा काही प्रकार करणं फार धोकादायक ठरू शकतो. भलेही इंटरनेटवर हा व्हिडीओ पसंत केला जात असला तरी असा प्रकार प्रत्यक्षात करण्याचा विचार अजिबात करू नका.

हे पण वाचा :

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं

बाबो! योगा मॅटचा असा वापर पाहून बिथरले सोशल मीडियातील लोक, म्हणाले - तुझे पाय कुठे आहेत?

Web Title: Viral Video : Motorcycle ‘Jugaad’ For Waterlogged Roads Impresses Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.