Transparent Fish: कधीच पाहिला नसेल तुम्ही असा मासा, पाण्यातून बाहेर काढताच होतो ट्रान्सपरन्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:59 PM2022-05-20T13:59:19+5:302022-05-20T14:04:15+5:30

Video of Transparent Fish: तुम्ही रंग बदलणारा सरडा अनेकदा पाहिला असेल किंवा त्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण तुम्ही कधी एखादा मासा रंग बदलतो हे कधी पाहिलं नसेल किंवा त्याबाबत ऐकलं नसेल.

Viral video of a fish becomes transparent as it is taken out of the water | Transparent Fish: कधीच पाहिला नसेल तुम्ही असा मासा, पाण्यातून बाहेर काढताच होतो ट्रान्सपरन्ट

Transparent Fish: कधीच पाहिला नसेल तुम्ही असा मासा, पाण्यातून बाहेर काढताच होतो ट्रान्सपरन्ट

Next

Video of Transparent Fish: समुद्राच्या पोटात अनेक रहस्य आणि रहस्यमय जीव बघायला मिळतात. यातील काही जीव तर असे असतात ज्यांची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. असाच एक मासा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की, जे काही तुम्ही पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न.

तुम्ही रंग बदलणारा सरडा अनेकदा पाहिला असेल किंवा त्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण तुम्ही कधी एखादा मासा रंग बदलतो हे कधी पाहिलं नसेल किंवा त्याबाबत ऐकलं नसेल. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सहजासहजी विश्वास ठेवणं अवघड होतं. पण हे सत्य आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हा मासा पाण्याबाहेर काढताच ट्रान्सपरन्ट होतो. तुम्हाला पाहून असंच वाटेल की, हा काचेचा मासा आहे. जेव्हा हा मासा पाण्यात असतो तेव्हा याचा रंग काळा होतो आणि जसं त्याला पाण्यातून बाहेर काढलं तर तो कलरलेस म्हणजे पारदर्शी दिसू लागतो. या व्हिडीओत ज्या व्यक्तीने मासा पकडलेला आहे त्याच्या हाताची बोटेही माशातून आरपार दिसतात. जसा मासा पाण्यात टाकतो त्याचा रंग काळा होतो. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. कारण त्यांनी असा मासा याआधी कधी पाहिलाच नहाीये. Cranchiidae फॅमिलीमध्ये ग्लास स्क्विडच्या जवळपास ६० प्रजाती आहेत. या माशांची लांबी १० सेंटीमीटर ते ३ मीटरपर्यंत असते.
 

 

Web Title: Viral video of a fish becomes transparent as it is taken out of the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.